शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

थोरले माधवराव पेशवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ चिंतामणीशी त्यांचे भावनिक नाते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:00 IST

आज मंगळवार आणि थोरले माधवराव पेशवे यांची तारखेने पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त थेऊरच्या चिंतामणीशी त्यांचे नाते जाणून घेऊया. 

पेशव्यांचं पुण्यावर विशेष प्रेम होते. शहराचे सुशोभीकरण, लोकांना सोयी- सुविधा पुरवणे, धार्मिक वृद्धीसाठी देवालये बांधणे अशी अनेक कामं पहिले बाजीराव ते दुसरे बाजीराव ह्या पेशव्यांनी केली. ह्यात मुख्यतः नाव घ्यावं लागेल ते नानासाहेब पेशव्यांचं. त्यांच्या कारकिर्दीत पुण्यात अनेक बदल घडत गेले. पुणे शहर “हिंदुस्थानचं नाक” म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं. ह्याच काळात पुण्यात अनेक गणेश मंदीर बांधली गेली. त्यांतील थेऊरच्या चिंतामणी मंदिरात थोरले माधवराव पेशवे यांनी जिथे अखेरचा श्वास घेतला त्याबद्दल प्रांजल वाघ यांच्या पेशवेकालीन गणेश मंदिर या लेखातील एक भाग जाणून घेऊ. 

पुण्यातील गणपती मंदिर आणि पेशवे ह्यांच्यात एक गाढ अध्यात्मिक नातं होतं. तसच थोरल्या माधवरावांच विशेष प्रेम असलेले मंदिर म्हणजे थेऊरचे चिंतामणी गणेश मंदिर! पुण्यापासून २५ कि मी वर असलेलं थेऊरच चिंतामणी मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक. चिंचवड देवस्थान ट्रस्ट ह्या देवळाची देखभाल करते. थेऊरचा चिंतामणी ह्यावर पेशव्यांची गाढ श्रद्धा. माधवराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यांची चिंतामणीवर असलेली  श्रद्धा इतकी गाढ होती की प्रत्येक लढाई अगोदर थेऊरला भेट देऊन चिंतामणीचा आशीर्वाद घेत असत. सध्याचं असलेलं देवळाच कार्यालय म्हजे माधवरावांचे थेऊर मधील निवासस्थान! क्षयरोगाने ग्रासलेले माधवराव त्यांच्या शेवटच्या दिवसात थेऊरच्या मंदिरात तळ ठोकून होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो देखील ह्याच चिंतामणी मंदिरामध्ये!

अष्टविनायकांपैकी ५ वे मंदिर होण्याचा मान ह्या मंदिरास लाभलेला आहे. मंदिर बरेच भव्य आहे आणि मंदिरात माधवराव पेशव्यांनी बांधलेला लाकडी सभामंडप आजही उभा आहे. थेऊरचा चिंतामणी हा स्वयंभू आहे. गणपतीची सोंड डावीकडे वळली असून, त्याचे दोन तेजस्वी नेत्र मूर्तीवर उठून दिसतात. मूर्तीला फसलेला भगवा शेंदूर ह्यातून ते दोन नेत्र सार्या विश्वाच्या हालचालींवर नजर ठेवून आहे असं काही क्षण भास होतो!

चिंतामणीचे स्थानमहात्म्य :

अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.

गणेश भक्त मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर