शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

October born astrology: ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्यासाठी सज्ज असतात; अधिक गुण-दोष वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 11:56 IST

October born astrology: ज्योतिष शास्त्रात जन्मदिनांक, जन्मवार, जन्मवेळ याला जितके महत्त्व आहे, तेवढेच तुमच्या जन्म महिन्यालादेखील आहे. जाणून घ्या भाकीत!

जर तुमचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला असेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की तुम्ही शांतीप्रिय आणि शांतिदूत असता. जन्मतः हुशार व्यक्तिमत्त्व अशी तुमची ओळख असल्याने लोकांना तुमचा हेवा वाटतो.बालपणी दिसायला ठीक ठाक, पण तुमचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे तुमचे सौंदर्य आणि आरोग्य सुधारते आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडते. 

तुमच्या भोवती मित्रांचा गराडा नसतो, कारण तुम्ही मोजक्या लोकांशी बोलणे पसंत करता. तुम्ही स्वतःला ओळखण्यात कमी पडत असाल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शकांची मदत घ्या. कारण तुमच्या ठायी उत्तम कलाकौशल्य असते. 

सुंदर असणे आणि सुंदर दिसणे यात फरक आहे. तुम्ही सुंदर दिसणाऱ्या लोकांपैकी आहात, जरी तुमचे नाक आणि शरीराची ठेवण साधी असली तरी तुमच्यामध्ये अशी एक मजबूत आकर्षण शक्ती असते, जी समोरच्यावर छाप पाडते. 

तुमच्याकडे अडचणींवर मात करण्याची शक्ती देखील आहे. अत्यंत निराशेच्या काळातही तुम्ही पुन्हा पुन्हा बाहेर पडता. आपण कोणत्याही समस्येवर त्वरित प्रतिसाद देण्यापासून स्वतःला वाचवता. वेळेनुसार आपला मुद्दा मांडणे आणि मोजके पण प्रभावी बोलणे ही आपली ओळख आहे. शब्द वाया घालवू नका पण योग्य वेळी योग्य शब्द टाकणे ही जबाबदारी ओळखा. याच गुणामुळे तुम्ही उत्तम राजकारणी होऊ शकता. 

बरेचदा तुमचे प्रेम यशस्वी होत नाही कुटुंबाचे सहकार्य देखील मिळत नाही. अशा वेळी प्रसंगाला धीराने तोंड द्या. जर प्रेमाच्या बाबतीत यशस्वी ठरलात तर तुमचा भाग्योदय निश्चित होतो. 

तंत्रज्ञान, राजकारण, कला, अभिनय, व्यवसाय किंवा औषध यांसारखी क्षेत्रे तुमच्यासाठी योग्य आहेत. आपण आपल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यावर कसे टिकवून ठेवायचे याचा अभ्यास करा. नेहमी मोठी स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या मुली दिसायला सुंदर असतात. त्यांचे डोळे आकर्षक असतात. मनाची थोडीशी मुत्सद्दी असते, पण ती इतरांना हानी पोहचवत नाही. प्रेमाच्या बाबतीत त्या भाबड्या असतात आणि यशस्वी ठरतात. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो पण त्यांना कोणावर तरी अवलंबून राहायची वाईट सवय असते. आत्मनिर्भर बना. आणि तुमच्या महिन्यात जन्मलेल्या यशस्वी लोकांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवा! 

जसे की, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहाद्दूर शास्त्री, अमिताभ बच्चन, रेखा, अमित शहा, हेमा, इ. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष