शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा जन्म ‘या’ ३ तारखांपैकी झालाय? अपार गुरुकृपा, कमावतात भरपूर पैसा, होतात मोठे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:00 IST

Numerology: या मूलांकाच्या व्यक्तींना गुरुकृपेमुळे व्यापार, करिअर यांमध्ये चांगले यश, प्रगती साध्य करता येते, असे सांगितले जाते.

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.  नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रातही गुरुला वरचे स्थान आहे. 

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ३ आहे. गुरु हा मूलांक ३ चा स्वामी आहे. अलीकडेच गुरु मेष राशीत मार्गी झाला आहे. सन २०२४ च्या मे महिन्यापर्यंत गुरु मेष राशीत विराजमान असेल. अंकशास्त्रानुसार गुरु स्वामित्व असलेले या मूलांकांच्या व्यक्ती धैर्यवान आणि निर्भय असतात. ऊर्जेचा संचार या व्यक्तींमध्ये असतो. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.

व्यापार अन् करिअरमध्ये मिळते यश, होते चांगली प्रगती

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती व्यवसायात खूप पुढे जातात, असे म्हटले जाते. मूलांक ३ असलेले लोक कलात्मक विचार आणि ज्ञानाने व्यवसायाला एक नवीन आयाम देतात. व्यापारातील समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. ज्ञान आणि विवेकबुद्धीच्या जोरावर या व्यक्ती नोकरीत उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचतात. गुरुकृपेमुळे करिअरमध्ये अपार यश आणि प्रगती साध्य करू शकतात. 

बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय असतात

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. स्वभावाने या व्यक्ती शांतताप्रिय, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय आहेत. कोणाचीही कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही.

उच्च महत्त्वाकांक्षेमुळे अपार यश, प्रगती

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसेच प्रतिभावान असतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. या व्यक्ती कोणत्याही कामाला विचार न करता हात लावत नाहीत. जे काही काम सुरू करतो ते पूर्ण करूनच थांबतात. त्यांचे परिश्रम आणि कोणत्याही कामाची आवड त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. त्यांच्या उच्च महत्त्वाकांक्षेमुळे ते नेहमीच यश, प्रगती साध्य करू शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष