शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

३ मूलांकावर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:31 IST

Numerology: गुरुकृपेमुळे व्यवसाय, व्यापार, करिअरमध्ये अपार यश, प्रगती साध्य करता येऊ शकते. काही प्रभावी मंत्र आणि रामबाण उपाय जाणून घ्या...

Numerology: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥  भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरु सच्चिदानंद आहे. जगातील सत् स्वरूपाचा कारक आहे. विश्वातील चित्शक्तीचा कारक, तेजोरुपी आनंद आहे. आठवड्यातील गुरुवार या दिवसावर गुरुचा अंमल असतो. गुरु हा ज्ञान, सुख व स्वराचा कारक, सचिव आहे. पिवळ्या रंगावर याचा प्रभाव आहे. भारतीय परंपरांमध्ये दत्त, स्वामी, सद्गुरू कृपा लाभावी, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. गुरुकृपा झाली, तर प्रत्यक्ष ब्रह्मांडनायकाचे दर्शन घडू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुला वरचे स्थान आहे. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. 

३ मूलांकाचा स्वामी असतो गुरु ग्रह

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ३ आहे. गुरु हा मूलांक ३ चा स्वामी आहे. गुरु हा आपल्या स्पर्शाने अथवा दृष्टीने मातीचे सोने करण्याची क्षमता असलेला ग्रह आहे. अलीकडेच गुरु ग्रह मिथुन राशीत विराजमान झाला आहे. अनेक वर्षांनंतर गुरु ग्रह अतिचारी गतीने गोचर करणार आहे. २०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे. 

धैर्यवान, बुद्धिमान, निर्भय असतात

अंकशास्त्रानुसार गुरु स्वामित्व असलेले या मूलांकांच्या व्यक्ती धैर्यवान आणि निर्भय असतात. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ऊर्जेचा संचार या व्यक्तींमध्ये असतो. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. कोणाचीही कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही.

शांतताप्रिय, मृदुभाषी, सत्यवादी असतात

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती व्यवसायात खूप पुढे जातात, असे म्हटले जाते. मूलांक ३ असलेले लोक कलात्मक विचार आणि ज्ञानाने व्यवसायाला एक नवीन आयाम देतात. व्यापारातील समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. स्वभावाने या व्यक्ती शांतताप्रिय, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात. 

करिअरमध्ये अपार यश, चांगली प्रगती

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसेच प्रतिभावान असतात. ज्ञान आणि विवेकबुद्धीच्या जोरावर या व्यक्ती नोकरीत उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचतात. गुरुकृपेमुळे करिअरमध्ये अपार यश आणि प्रगती साध्य करू शकतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. कोणतेही काम विचार न करता हातात घेत नाहीत. हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. परिश्रम आणि कामाची आवड त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. उच्च महत्त्वाकांक्षेमुळे ते नेहमीच यश, प्रगती साध्य करू शकतात.

गुरुचे काही अत्यंत प्रभावी मंत्र 

गुरु जर कमकुवत असेल, तर गुरुचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी तसेच गुरु मजबूत होण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा, असे म्हटले जाते. 

गुरु ग्रहाच्या संबंधित काही रामबाण उपाय

गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. गुरुच्या नक्षत्रात केलेले हे दान अधिक शुभफलदायी मानले जाते. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर गुरु यंत्राची स्थापना, पूजन करावे. तसेच गुरुचे रत्न पुष्कराज शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. रुद्राक्षही धारण करता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधीshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थ