शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Nrusimha Navratri 2024: श्रीलक्ष्मी नृसिंह करावलंबन स्तोत्र निर्मितीचा अद्भुत प्रसंग जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 14:02 IST

Nrisinha Navratri 2024: आजपासून नृसिंह नवरात्र सुरु झाली आहे, या कालावधीत नृसिंह स्तोत्र म्हणावे असे शास्त्र सांगते. या स्तोत्र निर्मितीमागील रोचक कथा जाणून घ्या.  

>> योगेश काटे, नांदेड 

आजपासुन श्रीलक्ष्मी नृसिंह घटस्थापना. महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यात तसेच कर्नाटक तेलंगाणा आंध्रप्रदेश या भागात श्री लक्ष्मीनृसिंह घट कुलधर्म  मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानिमित्त श्री लक्ष्मीनृहसिंह करावलंबन स्तोत्रानिर्मितिचा प्रसंग पाहू. 

या स्तोत्राचे  बीज पडले ते आद्य शंकराचार्य आणि कुमारील भट्ट यांच्या भेटीत मिळते भट्टपाद तुषानील घेत असताना आचार्या शिष्यांसहीत भेटण्यासाठी आले दोघांची भेट झाली. आचार्यांनी  ब्रमहसुत्रभाष्य भट्टपादांसमोर ठेवले आणि शास्त्रार्थ करण्याची इच्छा दर्शविली भट्टपाद म्हणाले, 'भाष्य उत्तम झाले मात्र मी आता शास्त्रार्थ करण्याच्या स्थितीत नाही, हां पण  माझा शिष्य मंडनमिश्र सोबत तुम्ही शास्त्रार्थ करु शकता आणि त्याला शास्त्रार्थ हरवले असता मला हरवल्या सारखे होईल.  असं म्हणत भट्टपादांनी आचार्यांना मंडनमिश्र कडे पाठवले आचार्य शिष्यांसहीत मंडनमिश्रकडे गेले आणि शास्त्रार्थाची  भिक्षा मागितली  व दोघांत शास्त्रार्थ सुरू झाला याचा शास्त्राचा विजय  निवाडा मंडनमिश्र ची पत्नी  सरस्वती  हिने करायाचा असे सर्वांच्या सहमतीने ठरले. 

दोघांत  बराच शास्त्रार्थ झाली मंडनमिश्रचा सगळा पूर्वपक्ष आचार्यांनी मोडीत काढला मंडनमिश्र पराभव मानणार तो पत्नी म्हणुन सरस्वतीने सर्वसंमतीने या शास्त्रार्थ आत भाग घेत एक अवघड प्रश्न टाकला तो म्हणजे कामशास्त्राबद्दल.  सगळी सभा  बुचकळ्यात पडली आचार्य शिष्य व मंडनमिश्र  सहीत फक्त सरस्वती व आचार्य स्थिर होते. आचार्यांनी सरस्वतीशी  थोडा वेळा मागितला या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देईन तसा वेळ मिळाला. पुढे आचार्य आणि शिष्यगण  या कामशास्त्राचे  उत्तर कसे मिळावावे  ते पण या यतिवेशाषत सगळा यक्षप्रश्न निर्माण झाला. आचार्यांनी पराकायाप्रवेश हा मार्ग सुचला मात्र पद्मपादास तो पटला नाही. आचार्यांनी  इतिहासातील काही घटना सांगत पद्मपादास मनविले आणि अमरुक राजाच्या देहात प्रवेश केला.अमरुक राजा हा  सद्वर्तनी नव्हता मात्र आचार्यांंनी  त्याच्या देहात प्रवेश केला त्याचे वागणे बदलले हे मंत्री व त्याच्या बायकांच्या लक्षात आले.  हा राजा नसुन कोणी तरी  यति असला पाहिजे त्या यतिच्या  देहाचा शोध घेतला पाहिजे असं  मंत्र्यांना  वाटले  व ते आचार्यांचा देहाचा  शोध घेत होती इकडे पद्मपाद इतर शिष्य अमरुक राजाच्या दरबारात आली आणि आचार्यांना त्यांच्या शास्त्रार्थची आठवण करुन देऊ लागली. आचार्यांनी तो राजाचा देह सोडला इकडे आचार्यांच्या देह राजाच्या सैनिकास मिळाला त्या देहास ते पंचतत्वात विलन करणार तो,आचार्य देहसावध होत झाले आणि हा मंत्र उच्चारला 

श्रीमत्पयोनिधिकेतन चक्रपाणे l भोगीन्द्रभोगमणिरंजित पूण्यमुर्तीहl 

या स्तोत्रांने भगवान नृसिंहाचे आळवणीने केली आणि राजाचे सैनिकच पंचतत्वात विलिन झाले. हा  सगळा अद्भुत प्रकार पासुन शिष्यांनी श्री लक्ष्मी नृसिंह व आचार्यांच्या चरणी दंडवत घातला पुढे कामशास्त्राबद्दलचे सगळे प्रश्न आद्य शंकराचार्य यांनी उत्तरे दिली आणि मंडनमिश्र हे सुरेश्वराचार्य  झाले. असा हा अद्भुत प्रसंग!

संदर्भग्रंथ : श्री संतकवि दासगणुमहाराज कृत  शंकराचार्य चरित्रातुन साभार

छायाचित्र :  नांदेड येथील श्री गोदालक्ष्मी नृसिंह  मंदीर 

टॅग्स :Nandedनांदेड