शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

November Born Astrology: तुमचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असतो का? मग तुमच्या स्वभावाचे गुण-दोष जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 11:38 IST

November Born Astrology : नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या कर्तृत्त्ववान म्हणून ओळखल्या जातात, पण त्यांनी स्वभावातील दोषही दूर करायला हवे; कोणते ते जाणून घ्या! 

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची ओळख एका वाक्यात सांगायची, तर ज्योतिषशास्त्र सांगते की या व्यक्ती जगात सर्वांचे भले करण्यासाठी जन्माला आलेल्या असतात. जर तुमचा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये असेल किंवा तुमच्या कुटुंबातील आवडत्या व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्हाला त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, बरोबर ना? तर हा घ्या नोव्हेंबर मधील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय...  

तुम्ही सर्वांमध्ये एकोपा आणण्याचे काम उत्तम प्रकारे करता. तुमच्या मित्रांना जुळवून घेणे ही अनेकदा तुमची जबाबदारी असते. जरी जग तुम्हाला खूप शांत आणि सौम्य स्वरुपात ओळखत आहे, परंतु ज्याने तुमचा राग पाहिला आहे त्याला माहित आहे की तुमच्यात किती ज्वालामुखी सुप्त स्वरूपात दडलेला आहे. मात्र या स्वभावामुळे तुम्ही कमी वयात रक्तदाबासारख्या आजारांना बळी पडू शकता. तुमच्या चेहऱ्यावर निरागस भाव असल्यामुळे तुमचे खोटे बोलणे ही समोरच्याला सहज खरे वाटू शकते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका. आरोग्याची विशेषतः केसांची काळजी घ्या. अन्यथा वाढत्या वयाआधीच टक्कल पडू लागेल. 

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या तरुणांमध्ये प्रेमाचा अमर्याद सागर असतो.तुम्ही उत्तम जीवनसाथी असता. तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती मिळाली नाही तरी तुम्ही तिला मिळवण्याचा अट्टहास करणार नाही, वा तिला विसरू शकणार नाही. आणि मिळाली तर तिच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण करता. तुम्ही आपले जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी खर्च करता. परंतु तेवढे प्रेम तुम्हाला न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहता. 

करिअर बाबतीत तुम्ही संवेदनशील लेखक, पोलीस, पत्रकार, कलाकार, सर्जन किंवा गुप्तचर विभागातील काम चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. भावनांवर थोडा आवर घातलात आणि रागावर नियंत्रण मिळवले तर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे शिखर गाठू शकाल. तुमच्या ठायी असलेल्या अतुलनीय सहनशक्तीमुळे, तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता. तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे, त्याचा वापर करा.

या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, चाचा नेहरू, सी.व्ही. रमण, कमल हसन, ऐश्वर्या राय, विराट कोहली, तब्बू, सानिया मिर्झा, नीता अंबानी ई. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष