शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

केवळ हस्तरेषाच नाही, तर तळहातावरील तीळही सांगेल तुमचे भाकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:39 IST

हातावरील रेषा, उंचवटे, शरीरावरील जन्मखूणा आणि तीळ देखील बरेच संकेत देतात. हे दोन्ही शुभ आणि अशुभ असू शकतात.

हस्तरेषेव्यतिरिक्त तळ हातावरील तीळदेखील जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा करतो. जसे की संपत्ती, प्रतिष्ठा, नोकरी तसेच लग्नाच्या विषयी अनेक गोष्टींचा त्यातून खुलासा होतो. आपण जाणून घेऊया काही प्रमुख आणि प्राथमिक गोष्टी!

हातावरील रेषा, उंचवटे, शरीरावरील जन्मखूणा आणि तीळ देखील बरेच संकेत देतात. हे दोन्ही शुभ आणि अशुभ असू शकतात. इथे मात्र आपण तळहातावरील तिळाबद्दल जाणून घेत आहोंत. तळ हातावरील तीळ सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा संपत्ती याबाबत सूचना देतो. 

छोट्या बोटावरील अर्थात करंगळीवरील तीळ: करंगळीवर तीळ असणे खूप शुभ आहे. पैशाच्या बाबतीत असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता नसते. आयुष्यातील अनेक अडचणींवर ते आपल्याजवळील श्रीमंतीने मात करू शकतात. 

मध्यम बोटावरील तीळ: मध्यम बोटावरील तीळ भाग्यकारक समजला जातो. या लोकांच्या जीवनात आनंद आणि संपत्ती दोन्हीची कमतरता नसते. 

मध्यम बोटाखाली तीळ: मध्यम बोटावर असलेला तीळ आनंद व मालमत्ता देते परंतु त्याच बोटाखाली तीळ असणे अपयश दर्शवते. मधल्या बोटाला जोडून असलेल्या तळहाताच्या उंचवट्याच्या क्षेत्राला शनि पर्वत म्हणतात. तिथे तीळ असणे, म्हणजे सर्व कार्यात विलंब झालाच म्हणून समजा. 

अनामिका : करंगळीच्या बाजूचे बोट, त्याला आपण अनामिका म्हणतो, तर इंग्रजीत 'रिंग फिंगर' अशी त्या बोटाची ओळख आहे.  रिंग फिंगरच्या खाली तीळ असल्यास सामाजिक, सरकारी कामात किंवा  संबंधित कामात आणि नोकरीमध्ये अडचण दर्शवते. त्यात खोटे बोलण्याची सवय असेल तर खोटेपणामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा मलीन होते किंवा अशा व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकले जाते.. अशा व्यक्तीला आपल्या जीवनात पोलीस आणि कोर्ट कार्यालयाचे उम्बरठे झिजवावे लागतात. 

चंद्रपर्वतवरील तीळ: आपल्या दोन्ही हातांना जोडून पाहिल्यावर दोन्ही हातावरील रेषांचा जोडून अर्धचंद्र तयार होतो.  या चंद्रावर तिळाची उपस्थिती मानसिक अस्थिरता दर्शवते.  हा तीळ त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगला नाही. असे लोक प्रेमात अपयशी ठरतात. लग्न ठरण्यासही त्यांना बराच विलंब होतो. हा तीळ वडीलधाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवतो.