शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
3
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
4
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
5
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
6
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
7
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सतत सकारात्मक कोणीही राहू शकत नाही; जमेल तेव्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 8:00 AM

जीवनातील नकारात्मक घटना पचवण्याची ताकद म्हणजे सकारात्मकता. ती लोकांना दाखवण्याची गरज नसते. ती आतून मनाला उभारी देते.

प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहायला शिका, असे सांगितले जाते. परंतु दर वेळी सकारात्मकता ओढून ताणून आणता येत नाही. जेव्हा आयुष्यात काही अवघड प्रसंग येतात, जसे की घटस्फोट होणे, जवळच्या व्यक्तीचे निधन होणे, प्रेम भंग होणे, फसवणूक होणे अशा प्रसंगाला आपण सकारात्मक वळण कसे देणार? त्यातूनही सकारात्मकता शोधणे हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध वर्तन ठरेल. हे वर्तन फार काळ टिकणार नाही. त्याला आपण अवसान आणणे असे म्हणतो.  मनाला मोकळे व्हावेसे वाटते, रडावेसे वाटते, कोणालातरी आपले दुःख सांगावेसे वाटते. या गोष्टी खूप नैसर्गिक आहेत. या नकारात्मक अजिबात नाहीत. भावनांचा निचरा होणे अतिशय गरजेचे असते, अन्यथा चुकीच्या ठिकाणी भावनांचा बांध फुटू शकतो.

जीवनातील नकारात्मक घटना पचवण्याची ताकद म्हणजे सकारात्मकता. ती लोकांना दाखवण्याची गरज नसते. ती आतून मनाला उभारी देते. नकारात्मक प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद देते. अशा सकारात्मकतेची आपल्याला गरज आहे. 

दुर्दैवाने लोक सकारात्मकतेचा चुकीचा अर्थ काढतात. विशेषतः समाज माध्यमांवर सगळेच जण आमचे आयुष्य किती गुण्यागोविंदाने सुरू आहे असे दाखवतात. ते पाहून इतरांच्या मनात असूया निर्माण होते आणि नकारात्मकतेत भर पडते. परंतु, आपल्या आयुष्याची नकारात्मक बाजू कोणी जाहीरपणे मांडत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात सगळे काही छान सुरु आहे, या संभ्रमात आपण जगत राहतो आणि आपल्या नियतीला दोष देत राहतो. परंतु, बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. कोणी त्यावर मात करून पुढे जातात तर कोणी तिथेच अडकून राहतात. 

सकारात्मकता आपल्या विचारांचा आणि जगण्याचा भाग झाली पाहिजे. परंतु, सकारात्मकतेचे मनाला ओझे वाटता कामा नये. ओढून ताणून आणलेला आनंद, उसने अवसान फार काळ टिकत नाही. खोटे मुखवटे गळून पडतात. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्वासू व्यक्तीशी सुख दुःखाची देवाण घेवाण करा. अशी व्यक्ती आयुष्यात नसेल, तर मनातल्या गोष्टी कागदावर उतरवून मन मोकळे करा. मन मोकळे झाले तरच सकारात्मकतेचा शिरकाव होईल आणि तुम्ही जगासाठी नाही तर स्वतःसाठी आनंदी राहायला शिकाल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी