शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:23 IST

Navratri 2024: नवरात्रीत अनेक जण अनवाणी चालताना दिसतात, शक्तीची उपासना करताना ही प्रथा सुरू ठेवण्याचा परस्परसंबंध कसा असेल ते जाणून घेऊया.

यंदा ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. उपासनेचा एक भाग म्हणून अनेक जण नवरात्रीत अनवाणी चालताना दिसतात. त्यामागे नेमका काय भाव असावा आणि त्याचे फायदे तोटे काय? शिवाय शास्त्रीय आधार काय तेही जाणून घेऊया. 

अनवाणी चालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना आपण चपला बाहेर काढून ठेवतो. चपलेबरोबर मनाला चिकटलेले विकारही मंदिराच्या पायरीशी ठेवून मंदिरात प्रवेश करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. शिवाय, आपल्यामुळे स्वच्छ परिसर घाण होऊ नये, ही देखील सद्भावना असते. तसेच, तिथल्या वातावरणाशी समरस होताना अनवाणी चालल्याचा खूप फायदा होतो. 

आपल्या पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात. संपूर्ण देहाचे अ‍ॅक्युपंक्चर पॉईंटस पायाच्या तळव्यात असतात. अनवाणी चालल्यामुळे जमिनीची विद्युत शक्ती पायाच्या तळव्यातून शरीरात शिरकाव करते. रक्त संक्रमण सुधारते. अनेक प्रकारच्या आजारातून सुटका होते. उच्च रक्तदाब कमी होतो. तणाव दूर होतो. डोकेदुखी कमी होते. उत्साह वाढतो. हृदयविकाराची शक्यता कमी होते. वजन नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होतात. म्हणून डॉक्टरदेखील आपल्या रुग्णांना रोज पंधरा मिनीटे बागेत, मैदानी परिसरात अनवाणी चालण्याचा सल्ला देतात. त्यामुळे केवळ नवरात्रीतच नाही, तर दररोज दिवसातील काही वेळ तरी अनवाणी चालणे हितावह ठरते. 

...मग नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी सुरू झाली?

ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहित नाही, मात्र कशी सुरू झाली असेल, हा तर्क आपण नक्कीच लावू शकतो. नवरात्रीत आपण घटस्थापना करतो. घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्याची रुजवण घालतो. एकार्थी मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात येतो. मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा, या हेतून भाविक नवरात्रीत वहाणा घालत नाहीत. 

नवरात्रीत नऊ दिवस भाविक, कांदा-लसूण खात नाहीत, मांसाहार करत नाहीत, एकभुक्त राहतात, फलाहार करतात. या गोष्टी शारीरिकदृष्ट्या फायदेशीर असतातच, शिवाय भावनिकदृष्ट्या देखील त्यागाचे महत्त्व शिकवतात. अनवाणी चालण्याचा पर्यायही त्याचाच एक भाग. स्वत:च्या शरीराला थोडेफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे, हा त्यामागचा मूळ विचार आहे. 

उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो.

परंतु, अलीकडे विचार लक्षात न घेता केवळ ट्रेंड म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. कुणी विचारले, तर त्यामागचे कारणही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचे हसे होतेच, परंतु धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते. म्हणून एखाद्या गोष्टीचे अनुसरण करायचे असेल, तर आधी त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्यानुसार कृती करावी.

Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Healthआरोग्य