शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Navratri 2024: मदर्स डे आपण साजरा करतोच, आज 'ललितापंचमी' साजरी करूया; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 10:30 IST

Navratri 2024: आज ललितापंचमी आहे, अर्थात देवीच्या मातृरूपाची पूजा करण्याचा दिवस; आजच्या दिवसाची नवरात्रीत योजना का? ते जाणून घ्या!

नुकतीच शारदीय नवरात्र सुरू झाली असून आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. हा दिवस ललितापंचमी नावे साजरा केला जातो. पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल रूपाची पूजा केली जाते. माता लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चिंतू शकत नाही. असे म्हणतात, `कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात संतती वाईट असू शकते, परंतु आई कधीच वाईट नसते. म्हणूनच तिला प्रेमरूपिणी, प्रेमांकित जननी म्हटले आहे. यावरून बालपणी सांगितलेली एक गोष्ट आठवून पहा.

एक मुलगा अतिशय खोडकर असतो. कोणाची मस्करी कर, कोणाच्या खोड्या काढ, कोणाच्या वस्तू पळव अशा सगळ्या त्याच्या वाईट सवयी. रोज शाळेतून त्याची तक्रार आईच्या कानावर पडत असे. आई त्याची समजूत काढते, चांगले संस्कार घालते परंतु एक चूक करते. लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून पाठीशी घालते. त्याच्या चुका पदरात घेते. मात्र, आईच्या चांगुलपणाचा मुलगा फायदा घेत एवढा बिघडतो, की मोठेपणी तो गावगुंड म्हणून ओळखला जातो. आई त्याची मनधरणी करते. त्याला सन्मार्गाला लावू पाहते. परंतु, हाताबाहेर गेलेला मुलगा आईचे ऐकूनही घेत नाही. एकदिवस गावात मारामारी होते, त्यात मुलाच्या हातून रागाच्या भरात खून होतो. पोलिस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगात टाकतात. आई रडत-ओरडत तुरुंगात पोहोचते. पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते. त्याच्यासमोर खूप रडते. मात्र, पाषाणहृदयी मुलावर काहीच परिणाम होत नाही. भेटण्याची वळ संपते. त्याआधी मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराच्या सळ्यांमधून आत आलेला आईचा कान कचकचून चावतो. आई विव्हळते. ओरडते. तिच्या कानाला रक्ताची धार लागते. ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते, त्यावर मुलगा तिला म्हणतो, `माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते, तर आज मी तुरुंगात नसतो.' तात्पर्य, मुले कृतघ्न होऊ शकतात, आई नाही!

म्हणून ललितामातेचा आदर्श! ती समस्त जगावर वात्सल्यतेचे छत्र धरते, परंतु चुकांची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत उन्हाचे चटकेही देते. 

आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते. यासाठी ती प्रसंगी वाईटपणादेखील घेते. रामायणात वनवासाला निघालेले श्रीराम, आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल कैकयी मातेला वंदन करून निघतात. याउलट भरत कैकयीला 'माता न तू वैरिणी' म्हणून संबोधतो. मात्र, कैकयी मातेने वाईटपणा घेतला नसता, तर श्रीराम प्रभू अयोध्येचे राजा होऊन केवळ राज्य करण्यात मग्न झाले असते. त्यांचा अवतार दुष्टांचा नायनाट करण्यासाठी झाला होता. या अवतार कार्याची अप्रत्यक्षपणे जाणीव कैकयी मातेने करून दिली. म्हणून दंडकारण्यात चौदा वर्षे खडतर वनवास भोगून श्रीरामांनी रावणासकट सर्व दैत्यांचा नायनाट केला आणि `रामराज्य' स्थापन केले. 

अशा आईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया. एक, जिने आपल्याला जन्म दिला, ती आपली आई. दुसरी, जी आपले पोषण करते, ती मातृभूमी आणि तिसरी, जिने आपल्याला आश्रय दिला, ती भारतभूमी. यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडे मागुया...!

जगदंबऽऽऽ उदयोस्तु!

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४