शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:53 IST

Navratri 2023: दुर्गा सप्तशती हा अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे आणि नवरात्रीत तो प्रत्येकाने वाचावा असे म्हटले जाते, पण का? ते वाचा!

यंदा १५ ऑक्टोबर पासून देवीची नवरात्र सुरू होत आहे. हा उत्सव शक्तीचा जागर करण्यासाठी आहे. देवी उपासनेला फार मोठी परंपरा असून ती प्राचीन काळापासून केली जाते. तिची आराधना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच केली जाते. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. भारतीय संस्कृतीत देवीचे स्थान अनन्यसाधारण असून तिला माता मानले जाते.दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून `दुर्गा सप्तशती'ची सर्वदूर ख्याती आहे. इतकेच नव्हे, तर तो स्त्री शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीयय ग्रंथ आहे. यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.

सर्व पुराणात 'मार्कंडेय पुराण' प्राचीन मानले जाते व 'दुर्गा सप्तशती' त्यातील अंश आहे. देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापले आहे. ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रगट होते. 

'दुर्गा सप्तशती'चे दुसरे नाव 'देवी महात्म्य'. याचे १३ अध्याय असून त्यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना `त्राहि भगवान' करून सोडणाऱ्या  दुष्ट व क्रूर राक्षसंशी तुंबळ युद्ध करून त्यांचा नि:पात कसा केला, याचे रसाळ भाषेत वर्णन केले आहे. मुळात या ग्रंथात ५६८ श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या ७०० झाली. म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने 'दुर्गा सप्तशती' म्हणून ओळखला जाऊ लागला.

या दुर्गा देवीची उपासना 'बाह्य' आणि 'अभ्यंतर' अशा दोन प्रकारे केली जाते. पैकी बाह्य उपासनेचे दोन भाग आहेत. ते असे-'वैदिक' आणि 'तांत्रिक'. वैदिक पूजेत यज्ञ, तप, भक्ती, ज्ञान तसेच योगा व्यतिरिक्त मूर्तिपूजाही समाविष्ट केली आहे. तांत्रिक साधनेत देवीपूजेत तांत्रिक सर्वार्थाने देवीशी एकरूप होतो, असे म्हणतात. 

महिषासुराला तमोगुणयुक्त मानवी मनाचे प्रतीक मानून 'मार्कंडेय पुराणा'त प्रस्तुत केले आहे. परंतु `देवी भागवता'त त्याला देवीवरील प्रेमाने उन्मत्त किंवा आंधळा दाखवला आहे.

'दुर्गा सप्तशती' दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती व ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करते. या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या  सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यात तिळमात्रही शंका नाही.

 

'दुर्गा सप्तशती' म्हणजे अस्य सिद्धमंत्रांचा अतुलनीय संग्रह असून त्याचा विधीवत केलेला पाठ पठणकत्र्यांची कुंडलिनी जागृत होण्यास सहाय्यभूत होतो. इतकेच नव्हे, तर नवरात्रात नवदुर्गांच्या उपासना व आरधनेमुळे षट्चक्रापैकी संबंधित चक्र जागृत होते, हे निर्विवाद! याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होते. सीतेच्या वियोगामुळे दु:खी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रात विधिवत 'सप्तशती' पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो. परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली. इतकेच नव्हे, तर लंकेवर मिळवलेला विजयही तिच्याच कृपेने प्राप्त झाला.

भगवान शंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले, 'पार्वती शक्तीशिवाय मी शिव, शवाप्रमाणे समाान असून, जेव्हा मी शक्तीयुक्त असतो, तेव्हा मीभक्ताची कुठलीही इच्छा तत्काळ पूर्ण करतो.

काच अर्गला, कीलक, प्राधनिक रहस्य. वैकृत रहस्य, मूर्ती रहस्य ही सप्तशतीची षडांगे असून त्याच्या क्रमात मतभेद असले, तरी सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेले  फळ यशावकाश मिळतेच मिळते. 

टॅग्स :Navratriनवरात्री