शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2022 : महानवमीच्या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे दिलेल्या विधिवत पद्धतीने करा उत्थापन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:01 IST

Navratri 2022 : नवरात्रीत स्थापन केलेल्या घटाचे उत्थापन करताना कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे ते जाणून घ्या!

अश्विन शुद्ध नवमी या तिथीला 'महानवमी' म्हणतात. तसेच 'दुर्गानवमी' असेही एक नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी आहे. शास्त्रानुसार या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे विधिवत उत्थापन केले जाते. अनेकांकडे नवरात्रीच्या दहाव्या दिवशी अर्थात दसऱ्याला घट हलवण्याची प्रथा आहे. आपल्या कुळाचारानुसार उत्थापनाचा दिवस निश्चित करून पुढे दिलेल्या माहितीनुसार उपचार करावेत. 

 व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन भगवती देवीची पूजा करावी. तत्पूर्वी देवीचे पूजास्थान ध्वज, पताका, फुलमाळा, तोरण लावून सुशोभित करावे. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार देवीची पंचदशोपचारी, षोडशोपचारी, षट्त्रिंशोपचारी किंवा राजोपचारी पूजा करावी. देवीला पक्वान्नांसहित भोजनाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. याच दिवशी घटाची पूजा करून आरती झाल्यावर घटावर अक्षता वाहून घट विधिपूर्वक हलवले जातात.  तसेच घटाभोवती उगवलेले धान्य कुंडीत पेरून तसेच लक्ष्मी स्वरूपात त्यातील काही धान्य तिजोरीत ठेवले जाते.

इतरही अनेक पूजाविधी अश्विन शुक्ल नवमीला करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये देवीच्या पूजेबरोबर कुमारीकापूजन केले जाते. देवी मानून कुमारिकेचे पूजन करण्यासाठी ही कुमारिका दोन वर्षे ते दहा वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक असते. दोन वर्षांच्या मुलीला 'कुमारी' आणि नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गास्वरूप मानतात.  

महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच महानवमीला तिच्यासाठी होम करून कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र तरीही महाअष्टमीला 'महालक्ष्मीव्रत' केले जाते, तर महानवमीला 'दुर्गानवमी' संबोधले जाते. कारण मुळात आदिमायेने महालक्ष्मीचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणून संबोधले जाते. 

महाराष्ट्रात घराघरात आणि देवीच्या सर्व मंदिरांमध्ये नवरात्रात घटस्थापना करून प्रत्येक तिथीची विहित पूजा श्रद्धापूर्वक केली जाते. या महानवमीत देवीला कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र हे बलिदान फक्त मंदिरातून दिले जाते. 

अशा रितीने देवीचे नवरात्र साजरे होऊन दसऱ्याच्या आगमनाची घरोघरी तयारी केली जाते.

टॅग्स :Navratriनवरात्री