Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन का केले जाते याची उकल महागौरीच्या कथेतून होते; वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 07:01 PM2021-10-13T19:01:16+5:302021-10-13T19:01:36+5:30

Navratri 2021 : या देवीचे स्थान हे आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र च्या मध्ये असून जागृकतेची तीन वैविध्यमध्ये समत्व आणते जाणणे, जाणून घेणे आणि करणे , हे चक्र पूर्व जन्मा शी सांभाधित आहे. आणि अंतर्गत सुख शांति प्रदान करते.

Navratri 2021: The story of Mahagauri explains why Kumarika Pujan is performed on Ashtami day; Read on! | Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन का केले जाते याची उकल महागौरीच्या कथेतून होते; वाचा!

Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन का केले जाते याची उकल महागौरीच्या कथेतून होते; वाचा!

Next

दुर्गेचे आठवे रूप म्हणजे “महागौरी”. देवीच्या या रूपाला ऐश्वर्य, तेजोमयी, चैतन्य मयी असेही संबोधले जाते. गौर म्हणजे गोरा, शुभ्र श्वेतवर्ण . ही दुर्गा श्वेतवर्णी आहे. शुभ्रतेचे वर्णन शंख, चंद्र आणि कुंदाच्या धवलंतेसमान आहे. हिची आभूषणे आणि वस्त्र ही श्वेत रंगाची आहेत म्हणून हिला शेतांबरा असेही म्हटले जाते.

पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी घोर तप केले, त्यामुळे तिचा रंग काळा झाला, शंकर जेंव्हा प्रसन्न झाले तेंव्हा त्यांनी जटेमधून गंगा प्रवाहीत केली त्यावेळी पार्वती त्यामध्ये शुद्ध होवून कांतिमान झाली आणि वीजेसमान चमकू लागली आणि शांत असे गौरी रूप प्राप्त झाले. महागौरी ही चतुर्भुज असून एका हातात त्रिशूल तर अका हातात डमरू आहे, तर तिसर्‍या हाताची अभय मुद्रा तर चौथ्या हाताची अभय मुद्रा आहे.

महागौरी चे वाहन हे पांढरा वृषभ आहे. महागौरी च्या साधनेने मनाची शुद्धता होते त्यामुळे निरागसता येवून ज्ञान आणि विद्वात्तेची प्राप्ती होते. साधकाच्या वृत्तीनं प्रेरित करून असत्याचा विनाश करून मनशांती मिळवून देते. महागौरी चे वय हे ८ वर्षाच्या बालिकेचे आहे म्हणून या दिवशी बालिका पूजन केले जाते.

या देवीचे स्थान हे आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र च्या मध्ये असून जागृकतेची तीन वैविध्यमध्ये समत्व आणते जाणणे, जाणून घेणे आणि करणे , हे चक्र पूर्व जन्मा शी सांभाधित आहे. आणि अंतर्गत सुख शांति प्रदान करते. अशक्य गोष्टी शक्य करण्याचे कार्य ही शक्ति करते. महागौरी ही शांत असल्याने तिला तिला शांतादेवी सुद्धा म्हटले जाते.शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा वध करण्यासाठी याच महागौरीने कौशिकी नावाने जन्म घेतल्याची कथा पुराणात आहे.

 

Web Title: Navratri 2021: The story of Mahagauri explains why Kumarika Pujan is performed on Ashtami day; Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.