शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Navratri 2020: मूल वाईट असू शकते, आई नाही, हे सांगणारा ललितापंचमीचा उत्सव!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 20, 2020 18:01 IST

Navratri 2020: आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते. यासाठी ती प्रसंगी वाईटपणादेखील घेते.

ठळक मुद्देआईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही जन्मदात्री आई, पोषण करणारी मातृभूमी, आश्रय देणारी भारतभूमी तिच्याप्रती कृतज्ञ होऊया.

ज्योत्स्ना गाडगीळ

नवरात्रीचा पाचवा दिवस ललितापंचमी नावे साजरा केला जातो. पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल रूपाची पूजा केली जाते. माता लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चिंतू शकत नाही. असे म्हणतात, `कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात संतती वाईट असू शकते, परंतु आई कधीच वाईट नसते. म्हणूनच तिला प्रेमरूपिणी, प्रेमांकित जननी म्हटले आहे. यावरून बालपणी सांगितलेली एक गोष्ट आठवून पहा.

हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

एक मुलगा अतिशय खोडकर असतो. कोणाची मस्करी कर, कोणाच्या खोड्या काढ, कोणाच्या वस्तू पळव अशा सगळ्या त्याच्या वाईट सवयी. रोज शाळेतून त्याची तक्रार आईच्या कानावर पडत असे. आई त्याची समजूत काढते, चांगले संस्कार घालते परंतु एक चूक करते. लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून पाठीशी घालते. त्याच्या चुका पदरात घेते. मात्र, आईच्या चांगुलपणाचा मुलगा फायदा घेत एवढा बिघडतो, की मोठेपणी तो गावगुंड म्हणून ओळखला जातो. आई त्याची मनधरणी करते. त्याला सन्मार्गाला लावू पाहते. परंतु, हाताबाहेर गेलेला मुलगा आईचे ऐकूनही घेत नाही. एकदिवस गावात मारामारी होते, त्यात मुलाच्या हातून रागाच्या भरात खून होतो. पोलिस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगात टाकतात. आई रडत-ओरडत तुरुंगात पोहोचते. पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते. त्याच्यासमोर खूप रडते. मात्र, पाषाणहृदयी मुलावर काहीच परिणाम होत नाही. भेटण्याची वळ संपते. त्याआधी मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराच्या सळ्यांमधून आत आलेला आईचा कान कचकचून चावतो. आई विव्हळते. ओरडते. तिच्या कानाला रक्ताची धार लागते. ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते, त्यावर मुलगा तिला म्हणतो, `माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते, तर आज मी तुरुंगात नसतो.' तात्पर्य, मुले कृतघ्न होऊ शकतात, आई नाही!

वरील कथा वाचत असताना, सद्यस्थितीतील एका मराठी मालिकेतील आई-मुलाची जोडी निश्चितच डोळ्यासमोर आली असेल. यात आईच्या प्रेमाला दोष द्यावा, की मुलाच्या लाडावलेल्या स्वभावाला? मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. अतिप्रेम, अतिकाळजी, अतिचिंता याची शेवटी अति तिथे माती होते. 

म्हणून ललितामातेचा आदर्श! ती समस्त जगावर वात्सल्यतेचे छत्र धरते, परंतु चुकांची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत उन्हाचे चटकेही देते. 

आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते. यासाठी ती प्रसंगी वाईटपणादेखील घेते. रामायणात वनवासाला निघालेले श्रीराम, आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल कैकयी मातेला वंदन करून निघतात. याउलट भरत कैकयीला 'माता न तू वैरिणी' म्हणून संबोधतो. मात्र, कैकयी मातेने वाईटपणा घेतला नसता, तर श्रीराम प्रभू अयोध्येचे राजा होऊन केवळ राज्य करण्यात मग्न झाले असते. त्यांचा अवतार दुष्टांचा नायनाट करण्यासाठी झाला होता. या अवतार कार्याची अप्रत्यक्षपणे जाणीव कैकयी मातेने करून दिली. म्हणून दंडकारण्यात चौदा वर्षे खडतर वनवास भोगून श्रीरामांनी रावणासकट सर्व दैत्यांचा नायनाट केला आणि `रामराज्य' स्थापन केले. 

अशा आईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया. एक, जिने आपल्याला जन्म दिला, ती आपली आई. दुसरी, जी आपले पोषण करते, ती मातृभूमी आणि तिसरी, जिने आपल्याला आश्रय दिला, ती भारतभूमी. यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडे मागुया...!

जगदंबऽऽऽ उदयोस्तु!

हेही वाचा : Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!

टॅग्स :Navratriनवरात्री