शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Navratra 2022: नवरात्रात देवीचा कृपाशिर्वाद लाभलाच तर तिच्याकडे काय मागाल? स्वामी विवेकानंद सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:03 IST

Navratra 2022: देव भेटावा असे आपल्याला फार वाटते, पण तो भेटलाच तर काय मागावे याचा विचार कधी केला आहे? स्वामी विवेकानंद त्यांचा स्वानुभव सांगतात. 

भगवान ज्यांना ज्यांना आजपर्यंत भेटले म्हणजे ज्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्या सर्व भक्तांचे लक्षण हे आहे, की ते स्वत: परमेश्वराची उपासना करत राहिले. उदा. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांशी प्रत्यक्ष जगदंबा बोलत होती. म्हणून काही त्यांनी मूर्तीपूजा सोडली नाही. तसेच त्या मूर्तीला मान देणे सोडले नाही. उलट ती जगदंबा त्या मूर्तीतून प्रगट होत होती हे जेव्हा रामकृष्णांच्या लक्षात आले, तेव्हा ते जगदंबेच्या त्या मूर्तीची अधिक भक्ती भावाने पूजा करू लागले.  ते कधी जगदंबा, जगदंबा तर कधी आई आई म्हणून ओरडत असत. रडत असत. यावरून भगवंताच्या मूर्ती किती श्रेष्ठ असतात, हे त्यांनी विवेकानंदांनाही पटवून दिले. 

एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले होते. गेल्यानंतर समोर बसले आणि त्यांनी विचारले, `तुम्ही देव पाहिला का हो?' ते म्हणाले `हो.' त्यावर स्वामींचा प्रतिप्रश्न, `देव कसा दिसतो?' परमहंस म्हणाले, `ते तुला सांगता यायचे नाही. पण तुला देव पहायचा असेल, तर मी तुला दाखवतो. मी देव पाहिलेला आहे. ज्यातून मी देव पाहिलेला आहे त्या देवाकडे तू जातोस का?' 

असे म्हणत परमहंसांनी स्वामींना आतल्या खोलीच्या दिशेने बोट करत म्हटले, `जा आत, तिथे जगदंबा बसली आहे. दर्शन घेऊन ये. विवेकानंद उठले, आत गेले व बऱ्याच वेळाने बाहेर आले. परमहंसांनी उत्सुकतेने विचारले, `दिसली का देवी? देवीकडे काय मागितले? विवेकानंद म्हणाले, `मी देवीकडे ज्ञान, तेज आणि वैराग्य मागितले.'

परमहंस म्हणाले, `कधी नव्हे ते देवीने दर्शन दिले आणि तू तिच्याकडे वैराग्य मागून आलास? परत जा आणि देवीकडे धन, संपत्ती, वैभव, प्रसिद्धी मागून घे.'विवेकानंद पुन्हा आत गेले आणि आशीर्वाद घेऊन बाहेर आले. या खेपेतही आपण आधीसारखेच मागितले. या घटनेवरून विवेकानंदांनी अनुमान काढले व परमहंसांना म्हणाले, `मूर्ती दिसायला साधी असली, तरी त्यात देवीचे वास्तव्य आहे. हे वास्तव्य प्रत्येक मूर्तीत असते. परंतु ते जाणवण्यासाठी सत्संग घडावा लागतो आणि देवाला पाहण्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून संत म्हणत असत, देव देखिला देखिला, गुरुकृपे ओळखिला!

ऐहिक सौख्य कितीही मागितले तरी ते कमीच पडणार आहे, म्हणून देवाकडे काही मागत बसण्यापेक्षा देवालाच मागून घेणे इष्ट! हीच प्रार्थना आपणही येत्या नवरात्रीच्या काळात देवीकडे करूया. सर्वांना संतती, सन्मती आणि सद्बुद्धी दे अशी विनंती करूया! 

उदे ग अंबे उदे!

टॅग्स :Navratriनवरात्रीSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद