शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Navanna Purnima 2023: दसऱ्याला आपण भाताच्या लोम्ब्यांचे तोरण दाराला लावतो, त्याचा नवान्न पौर्णिमेशी काय संबंध? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:54 IST

Kojagiri Purnima 2023: घरात अन्न धान्याची वाढ व्हावी म्हणून नवान्न पौर्णिमेला केले जाते नवीन धान्याचे पूजन; जाणून घ्या माहिती आणि व्रतविधी!

कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतोच, पण नवान्न पौर्णिमा कधी असते असे विचार करत असाल तर जाणून घ्या, आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा सुरू होत असून २८ ऑक्टोबर रोजी ती पूर्ण होणार असल्याने २८ ला कोजागिरी आणि नवान्न पौर्णिमा साजरी केली जाईल. ती का आणि कशी साजरी केली जाते तेही पाहू. 

दसऱ्याला आपण झेंडू आणि आम्रपल्लवाचे तोरण तर लावतोच, शिवाय भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल यापासून तयार केलेले तोरणही लावतो. हे तोरण प्रतीक असते नवान्न पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नवधान्याच्या पूजेचे! 

गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते. भात हे त्यापैकी एक धान्य! नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदुळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो. त्याची पूजा केली जाते. म्हणून दसऱ्यालाही भाताच्या लोम्बी तोरणात अडकवून ते वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते. 

कोजागिरीला आपण लक्ष्मीची, चंद्राची तर पूजा करतोच, पण नवान्न पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करायची ती माता अन्नपूर्णेची, कारण तीच आपल्याला धन धान्य देते. तिच्या कृपेने सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होउदे, हीच प्रार्थना करायची.

टॅग्स :kojagariकोजागिरी