शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Narmada Jayanti 2023: 'महाप्रलय झाला तरी नर्मदा लुप्त होणार नाही' असे तिला वरदान आहे; वाचा ठळक वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 14:36 IST

Narmada Jayanti 2023: आपल्याकडे १८ पुराणं आहेत, मात्र नदी म्हणून फक्त नर्मदेचे पुराण आहे, आज तिची जयंती; त्यानिमित्त वाचा सिद्ध मंत्र आणि मुख्य वैशिष्ट्य!

>> राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज, अमळनेर

आज माघ शुद्ध सप्तमी (७),म्हणजेच "श्री रथसप्तमी" म्हणजेच श्रीनर्मदा जयंती". आज आपण सारे पुण्यसलीला श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी गेला असाल. ज्यांना शक्य नाही ते घरीच श्री नर्मदा मय्याचे स्मरण, चिंतन व मानसिक पूजन करतील, ते करावे अशी अपेक्षा व आग्रह. स्नानाला बसण्यापूर्वी आपण श्री नर्मदा मैया चे स्मरण करून मगच स्नानास सुरुवात करावी. आपणा साठी श्री नर्मदा मैया चा ध्यानमंत्र व स्नान मंत्र व नवार्ण मंत्र येथे देत आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा हि प्रार्थना.

मय्याचा ध्यान मंत्र

व्याख्या मुद्रां प्रवरद करे दक्षिणे धारयंतीं। वामे लिंगं सलील कलशं भूषयंतीं वरेण्याम्।   अंभोजस्थां मकर रथगां दिव्य सौंदर्य मूर्तीं। वंदे रेवां कलकल रवां शंभू कन्यां शरण्याम।।

मय्याचा  तारक मंत्र :- नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशी ।  नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात ।।

मय्याचा नवार्ण मंत्र :- ओम र्हीं श्रीं नर्मदायै नमः ।।

अशा प्रकारे मैयाचे स्मरण करून मग स्नान वंदन पूजन अर्चन इत्यादी विधी करावेत ही प्रार्थना. जाणून घेऊया तिची ठळक वैशिष्ट्य!

१) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.११) श्रीनर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात.१५ ) आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प! पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा हा विलक्षण अनुभव घ्यावा! 

संपर्क :  94 222 84 666/ 79 72 00 28 70