शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:43 IST

Narak Chaturdashi 2024: दिवाळीची पहिली आंघोळ नरक चतुर्दशीला केली जाते, कारीटाचे फळ चिरडले जाते; त्यामागील कारण जाणून घ्या!

३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा (Diwali 2024) तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi 2024) ! अश्विन वद्य चतुर्दशीस 'नरक चतुर्दशी' म्हणतात. सर्वांना पीडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला `नरक चतुर्दशी' हे नाव पडले. मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की, `माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये!' कृष्णाने त्याला `तथास्तु' म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो. 

या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगलस्नान व दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. तसेच नरकासुराच्या नि:पाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडतात आणि त्याचा रस कपाळाला लावतात. नरकासुराची शेणमातीची प्रतिमा करून त्यावर घरादारातील कचरा टाकून जणू काही दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करतात. 

या दिवशी घरातील देवांनादेखील पंचामृतस्नान व अभिषेक करून अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात आणि देवपूजाही सूर्योदयाच्या आत करतात. गोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. पणत्याही पहाटेच लावतात. सर्वत्र सुख समृद्धी यावी म्हणून अंगणात दोन, तुळशीपुढे एक, पाण्याजवळ एक, देवाजवळ एक पणत्या लावतात.दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने साफसफाई करून घर लख्ख करतात. 

नरक चतुर्दशीला नवे कपडे घालून आप्त स्वकीयांची गाठभेट घेतली जाते. फराळाला बोलावले जाते. पाहुणचार केला जातो. अलीकडे दिवाळी पहाट या निमित्ताने सुरेल गाण्यांची मैफल रंगते. फटाके, आतषबाजी, रंग रांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते. 

असा हा दिवाळीचा रंग, गंध, स्पर्श अनुभवूया आणि आपल्या आतील आणि बाहेरील नरकासूराच्या दुष्ट प्रवृत्तीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून प्रत्येक दिवस आनंदाचा, मांगल्याचा आणि चैतन्याचा साजरा करता येईल. नाही का?

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४