शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

Narad Jayanti 2025: कसे होते देवर्षी नारद? पुराणातील व्यक्तिचित्रण वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:05 IST

Narad Jayanti 2025: आज १३ मे रोजी देवर्षि नारद जयंती आहे, मालिकेत दाखवतात तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व नसून ते नेमके कसे होते ते जाणून घ्या.

ब्रम्हदेवांचा मानसपुत्र, विष्णुंचा प्रियभक्त, त्रैलोक्यात संचार करणारे देवदानवांनंतरचे एकमेव मुनी. ऑल स्पेस परमीट. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव, मानव, पशू पक्षी सर्वांशी मैत्री. जगन्मित्र, अजातशत्रु. अशा देवर्षी नारद यांची आज जयंती!

व्यक्तिमत्त्व अगदी साधे, धोतर, उपरणे, एका हातात वीणा दुसर्‍या हातात चिपळया, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. मानवासारखेच सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवरूपी प्रतिनिधी. संकटकाळी देवाच्या आधी धावून जाणारे (जसे आपल्या खाजगी चानेलचे प्रतींनिधी शासनाच्याही आधी जाऊन पोहोचतात तसे) कोणतेही स्मरण कोणीही केलेले नसतांना धाऊन जाणारे संकटमोचक अशी त्यांची खरी ओळख आहे. 

डोक्यात भरपूर कल्पना असणारे, कल्पनाशक्तीचे विपुल भांडार. आधुनिक गुगल ऋषी. संगणक देवताच जणू! कधी हार न मानणारे व उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखा युक्तिवाद मांडून, प्रसंगी भांडून, कोणत्याही समस्येवर तोडगा काढून, शेवट गोड करणारे असे हे देवर्षी नारद!

देवही संभ्रमीत होतील अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता, आपल्या गोलमाल व गोडगोड बोलण्याने समोरच्यावर छान छाप पाडून, अगदी स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या भल्या भल्या उन्मत्त राक्षसी वृत्तीच्या उच्चपदस्थांनाही सहज कह्यात घेणारे (उल्लू बनवणारे) नारद. अगा असा मुनी झालाची नाही.

त्यांच्यावर आरोप खूप झाले. कळीचा नारद, (खरे तर ह्यांना बघितलेच की अनेकांची कळी खुलायची, काहीतरी नवे घडणार, किंवा ऐकायला मिळणार!! म्हणून कळीचा नारद), आगलाव्या नारद, लावालाव्या करणारा, काड्या करणारा, भांडण लावून देऊन, दुरून मजा बघणारा. पण इतके आरोप होवूनही हे महाराज भक्तीत गुंग. त्यांनी कधीही हे सर्व आरोप मनावर घेतलेच नाही की रागाने फुगून बसले नाहीत.

बहुजनहित व नीतीची, धर्माची बाजू घेणे, न्यायाने तडजोड करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. पृथ्वीतलावरच्या यच्चयावत समाज हितासाठी, विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांसारीक, भौतिक, सांस्कृतिक क्षेत्रात दिवस रात्र संशोधन करून तन मन धनाने कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत, पालनकर्त्या विष्णूंना त्वरेने जाऊन ते जगातील नववे आश्चर्य म्हणून सांगून त्यांच्या कार्याचा उचित बहुमान घडविण्यासाठी त्यांना “जीवनगौरव” देऊन सत्कार करा सांगणारे आपले नारदच. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनि, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, भक्त, जपी, तपी, असे अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत धूलरत्न, जगासमोर आणले गेले. वाल्मिकी, ध्रुव, प्रह्लाद, अनसूया, गौतम ऋषि, भगीरथ, मार्कंडेय, संदीपक, असे अनेक जे प्रसिद्धी टाळत होते, त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यासहित उजेडात आणले.

अगदी कोणाच्याही दालनात, कोणत्याही वेळेत त्यांना मुक्त प्रवेश होता. मग आता  सांगा, अशी व्यक्ति का नाही आवडणार आबालवृद्धांना? प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात यांची उपस्थिती गुप्त सुप्त रूपात किंवा कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतातच. कारण तेथे भगवंताचे अधिष्ठान असते.जिथे नारायण तिथे नारद!