शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

Mohini Ekadashi 2022: मोहिनी एकादशीच्या व्रताने सर्व दुःखं दूर होऊन संसाराची आसक्ती कमी होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 11:53 IST

Mohini Ekadashi 2022: यंदा १२ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी.

हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विधिने पूजन केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात एकादशी दोनदा येते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यंदा १२ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते. 

भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप धारण का केले, त्याची कथा-

हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, समुद्र मंथनानंतर बाहेर ;पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप  पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुक्ल एकादशीला घडली असे म्हणतात. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. व या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते.

पूजेची पद्धत

मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर, पूजास्थळावर बसून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा करावी. भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळशी, फुले, फळे वहावीत. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा १०८  वेळा जप करावा. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. पूर्ण दिवस उपास करावा. गरजूंना अन्नदान करावे. दुसर्‍या दिवशी देवपूजा करून उपास सोडावा.