शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मन की गुंजन सुनो तुम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:19 IST

मनापासून श्रोता झालं की विषयांचे बंध हळूहळू सुटू लागतात..

मनावर जेवढे जास्त अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो तितक्या वेगाने ते चौफेर घोडदौड करते. माणूस जसा एकाग्रतेच्या सान्निध्यात स्वतःला समर्पित करण्याचा प्रयत्न करू लागले त्याच्या अंतर्मनात विचारचक्र प्रचंड वेगात धावू लागते.. त्यावर लगाम मिळवण्यासाठी मग साधनेच्या किंवा गुरूच्या छत्रछायेत जावं लागतं.

नभातून राजहंसांचा थवा प्रवास करत होता. एका तलावात पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले.मोती नसताना ते अडकले.मोती नसताना ते भासले. म्हणजे नसलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..!चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषय जाळ्यात अडकतात.तू नित्यमुक्त अशा परमात्म्याचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनापासून श्रोता झालं की विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की शरीर नश्वर आहे मात्र परमात्मा हा शाश्वत सत्य आहे..

एक कथा अशी प्रचलित आहे.., दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढयात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या 'स्त्री'ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. 'स्त्री' शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनात घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या 'स्त्री'च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचं रुप दिसत होतं....

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक