शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मंगळाचे स्थलांतर बारा राशींसाठी ठरेल लाभदायक की सामान्य ; घेऊया थोडक्यात आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:45 IST

मंगळ प्रत्येकाच्या राशीला येतो, कधी चांगले फळ देतो तर कधी आयुष्यभराची शिकवण!

जून महिन्यात मंगळ राशीचा राशीचे स्थलांतर झाले आहे. हा बदल २ जून रोजी झाला असून या दिवशी मंगळाने मिथुन राशि सोडली आणि कर्क राशीत प्रवेश केला आहे. या स्थित्यंतरामुळे कर्क राशीसह अन्य बारा राशींमध्ये काय बदल घडणार आहे ते पाहू. 

मेष : मंगळाचे हे परिवर्तन आपल्यासाठी शुभ असेल. जंगम व स्थावर मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवाराचे सहकार्य मिळेल. कोणाबरोबर अनावश्यक वादात अडकू नका.

वृषभ : कोणाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून अनावश्यक वाद टाळा. प्रत्येक परिस्थिती संयमाने हाताळा. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : आपण कोणतेही वाहन चालवत असल्यास काळजी घ्या. वैवाहिक जीवन चांगले राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शाब्दिक चकमकी होऊन वादाला तोंड फुटू शकते. वादाच्या क्षणी मौन धारण करा. 

कर्क : मंगळ ग्रहाच्या प्रवेशाने परिस्थिती थोडी प्रतिकूल निर्माण होईल. परंतु घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या.

सिंह : हा राशि परिवर्तन शुभ होईल. पैशासंबंधित निर्णय सुज्ञपणे घ्या. उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पुढचे काही दिवस आनंदाने आणि मनाप्रमाणे जातील.  आई वडिलांची काळजी घ्या. 

कन्या : या राशीच्या मुलांसाठी चांगला काळ आहे. संधीचे सोने करा. कठोर परिश्रम करा, फळ निश्चित मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक स्थिती सामान्य असेल.

तुला : कुटुंबाशी सामंजस्य राहील. आर्थिक फायद्याचे योग असतील. प्रगतीची चिन्हे नाहीत. परिस्थिती सामान्य राहील, परंतु कसलीही काळजी नसेल. काही काळ शांतचित्ताने नामःस्मरण करा. 

वृश्चिक : या काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. शारीरिक आणि मानसिक वेदना होऊ शकतात. अध्यात्मिक पाठबळ मिळावे आणि परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून इष्ट देवतेची मनोभावे उपासना करा. हे ही दिवस जातील. 

धनु : आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. व्यर्थ खर्च करू नका. वादाचे प्रसंग ओढावले, तर मौन धारण करा. तुमच्या स्पष्टवक्तेपणावर काही काळ आळा घाला अन्यथा नाते संबंध दुरावू शकतील. 

मकर : या काळात कोणाशी टोकाचे वाद होऊ शकतात. यासाठी थोडे सबुरीने घ्या. वाईट काळ निघून जाईल, परंतु वादामुळे नाती दुरावणार नाहीत, याची काळजी घ्या. कुटुंबात सुसंवाद राखता येईल. आर्थिक स्थिती सामान्य असेल.

कुंभ : तुम्हाला यश मिळेल. आपला राग आटोक्यात ठेवा. विनाकारण पैसे खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या. काही दिवस सामान्य स्थिती असेल, परंतु लवकरच परिस्थिती बदलून नवीन संधी चालून येईल. 

मीन : आर्थिक फायद्याचे योग आहेत. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम घ्या व संधी दवडू नका. नवनवे मार्ग खुणावतील. सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. कुटुंबासमवेत वेळ घालवा. त्यांचे मार्गदर्शन घ्या.