शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:51 IST

May Born Astro: मे महिन्यात तुमचा अथवा तुमच्या प्रिय जनांचा वाढदिवस असेल तर त्यांच्या स्वभावात कोणते दोष गुण असतात, हे ज्योतिष शास्त्राकडून जाणून घ्या!

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते  आणि त्यांना अमाप लोकप्रियता मिळते. थोडेसे निष्काळजी आणि थोडेसे शीघ्रकोपी असतात. जे ठरवतात ते मिळवतात. त्यांचा स्वभाव राजसी असतो, त्यामुळे थोडी अहंकारी वृत्ती असते. तसेच त्यागाचीही वृत्ती असते. 

साधे राहणीमान यांना मानवतच नाही. प्रत्येक गोष्टीत राजेशाही थाट लागतो. त्यांची स्वत: काम करण्याची तयारी कमी आणि दुसऱ्यांकडून काम करवून घेण्याची सवय जास्त असते. घरातल्या सदस्यांनी घरात आवराआवर करावी अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु स्वत:च्या कामाचा पसारा त्यांना आवरत नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असल्याने चारचौघात उठून दिसत़े घरात ते कसेही राहत असले, तरी बाहेर अगदी टापटिप राहतात. 

प्रेम आणि सांसारिक आयुष्याबाबत त्यांना मजा मस्करी आवडत नाही. ते आपली मर्यादा ओलांडत नाहीत. अनैतिक गोष्टींना त्यांच्याकडे अजिबाब वाव नसतो. भविष्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट असतात. ते आपल्या जोडीदाराकडून कधी प्रेमाने तर कधी अरेरावी करून मनासारखे काम करवून घेतात. मैत्रीच्या बाबतीत ते अतिशय प्रामाणिक असतात. शेवटपर्यंत आपली मैत्री निभावतात. 

पत्रकार, लेखक, संगणक अभियंता, पायलट, डॉक्टर, प्रशासन अधिकारी अशा मोठ्या हुद्द्यापर्यंत यांचा प्रवास जातो. मुलींना फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात गती मिळते. 

या लोकांचा कोणी विश्वासघात केला, तर ते त्यांच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवत नाहीत. एवढेच काय, तर त्यांच्याशी पुनश्च संबंधही ठेवत नाहीत. प्रत्येक नात्यात ते अतिशय गुंतून जातात आणि समोरच्याकडूनही तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा ठेवतात. या स्वभावाचा कधी त्यांना तर कधी इतरांना त्रास होतो. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती प्रेम करताना हात राखत नाहीत. आपले सर्वस्व अर्पण करून टाकतात. याच स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात त्यामुळे त्यांचे हितशत्रू वाढत जातात. अति स्पष्टवक्तेपणामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते, याची त्यांना जाणीव होत नाही. ते आपलेच म्हणणे खरे करतात. त्यामुळे यांच्या आयुष्यात अनेक लोक येऊनही त्यांचे हितसंबंध फार काळ टिकत नाहीत. यासाठी त्यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे गरजेचे आहे. 

मे महिन्यात माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, करण जोहर यांसारख्या सिनेतारकांचा वाढदिवस असतो. तुमचाही वाढदिवस या महिन्यात असेल, तर वरील गुणविशेष तुमच्याशी जुळतात का हे ताडून पहा...!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष