आज २९ जानेवारी रोजी पौष तथा मौनी अमावस्या (Mauni Amavasya 2025)आहे. ही अमावस्या अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. या तिथीला अवकाशात होणारी विशिष्ट ग्रहस्थिती पाहता महाकुंभाच्या स्थळी शाही स्नानाचे आयोजन केले जाते. आजच्या दिवशी मौन धरून देवपूजा, ध्यान, चिंतन, जप-जाप्य केले असता अध्यात्मिक उन्नती होते असा भाविकांचा अनुभव आहे. त्याच बरोबर प्रापंचिक लोकांनी संसार सुखासाठी कोणते उपाय करावेत हेही सांगितले आहे.
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्या म्हणजे काय? इतर अमावस्येच्या तुलनेत ती वेगळी कशी? जाणून घ्या!
आजच्या तिथीला अवकाशात असलेली ग्रहस्थिती अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे म्हणूनच आजच्या दिवशी महाकुंभात तिसरे शाही स्नान पार पडले. मात्र ज्यांना तिथे जाऊन पुण्य संचयाचा लाभ घेता आला नाही, त्यांनी निराश न होता पुढील ज्योतिष शास्त्रीय उपाय जरूर करावेत, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल. त्याबरोबरीने राशीनुसार दिलेले मंत्र जप करा, ज्यामुळे लाभ होईल असे ज्योतिष अभ्यासक श्वेता यांनी सांगितले आहे.
>> सर्वप्रथम मौनी अमावस्येला सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला राईच्या तेलाचा दिवा लावा. पितरांचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करा, की तुमचे आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या. 'ओम पितराय नमः' हा जप करा.
>> मौनी अमावस्येच्या दिवशी दानाचे महत्त्व अधिक असते. त्या निमित्ताने तीळ, गजक, गूळ, चादर, स्वेटर तथा उपयुक्त वस्तूंचे गरजवंतांना दान करा. त्यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा तुम्हाला बरकत देतील आणि पुण्यसंचय होईल.
>> मौनी अमावस्येला घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी कुठेही न तुटलेल्या २१ लवंगा जळत्या कापरावर धरा आणि त्या घराच्या कानाकोपऱ्यात फिरवा. त्यामुळे सगळी नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जेने घर भरून जाईल.
त्याबरोबरीने राशीनुसार दिलेले उपायही करा -
मेष - हनुमान चालीसा पठण वृषभ - श्रीसूक्त पठण मिथुन - ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा १०८ वेळा जप कर्क - महामृत्युंजय जप सिंह - आदित्य हृद्य स्तोत्र कन्या - ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा १०८ वेळा जप तूळ - दुर्गा चालीसा पठण वृश्चिक - हनुमान चालीसा ३ वेळा धनु - विष्णू सहस्त्र नाम मकर - शनी चालीसा कुंभ -ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप १०८ वेळा मीन - विष्णू सहस्त्र नाम पठण