शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Marriage Muhurta: सनई चौघड्याचे सूर जूनपर्यंतच, मग नोव्हेंबर पर्यंत बघावी लागणार वाट; जाणून घ्या आगामी लग्न मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:06 IST

Marriage Muhurta: चातुर्मासात लग्न करत नाही हे आपण जाणतो, त्यात यंदा भर आहे अधिक श्रावण मासाची, त्यामुळे विवाहेच्छुकांना पाच महिने करावी लागणार प्रतीक्षा!

आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणतो व कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतो. याचाच अर्थ चार महिने देव झोपतात असे आपण म्हणतो. यंदा २९ जून रोजी देवशयनी एकादशी आहे. देवाच्या झोपेचे चार महिने आपण मंगलकार्य वगळता सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो. तो काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिक मासात देव उठले की नंतर मंगलकार्याला सुरुवात होते. अशातच यंदा भर आहे अधिक श्रावण मासाची! त्यामुळे जूननंतर लग्नकार्याची सुरूवात थेट नोव्हेंबर नंतर होईल.  

२०२३ मध्ये नोव्हेंबर आणि डिसेम्बर मधील मुहूर्त :

नोव्हेंबर - २३, २४, २७, २८,२९डिसेंबर - ५,६,७,,९,११, १५

पण हा पाच महिन्यांचा कालावधी लग्नासाठी निषिद्ध का? कारण... 

आपल्या सनातन धर्माने अत्यंत विचारपूर्वक देश-काल-स्थिती सांभाळून या गोष्टींची आखणी केली आहे व त्याचा संबंध धर्म तसेच ईश्वराशी जोडला आहे. धर्म व्यवस्था ही आपल्या सुरक्षिततेसाठी, विकासासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली रचना असते. त्यानुसार नियमांचे पालन करून आपले आयुष्य सुकर व्हावे, एवढाच त्यामागील हेतू असतो. 

एखादी गोष्ट सहज सांगितली तर त्याकडे दुर्लक्ष करणे, हा मनुष्यस्वभाव असतो. परंतु त्याला धाकदपटशा लगेच कळतो. शिक्षा होईल या भितीने नियमांचे पालन करतो. हा मनुष्यस्वभाव ओळखून सनातन धर्माने प्रत्येक गोष्टीची सांगड देव-धर्माशी लावून दिली आहे. समाजाने नियमांचे पालन करावे यासाठी 'धाक', `लोभ' नाहीतर `प्रेम' यापैकी एक मार्ग अनुसरावा लागतो. सद्यस्थितीत देवाबद्दल प्रेम पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. मग मार्ग राहतो धाकाचा नाहीतर लोभाचा! म्हणून तोच मार्ग अनुसरून `देवशयनी एकादशी'चे आयोजन धर्मशास्त्राने केले आहे. 

आषाढात पावसाचे आगमन होते. पृथ्वी हरीत होते. सृजनतेचा सोहळा रंगतो. धान्य रुजते. पिक फोफावते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यामुळे या चार महिन्यात मनुष्याला आपली उणीव भासणार नाही, अशी देवानेच व्यवस्था लावून दिलेली असते. अशी व्यवस्था लावून देत पुढील चार महिने सृष्टीचा कारभार तू आपल्या हाती घे आणि नवनिर्मितीचा आनंद घे असे म्हणत परमेश्वर मनुष्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकतो. काही अडीअडचण आली तर तो आहेच, परंतु त्याच्या अनुपस्थितीत आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकू हा त्याला विश्वासही आहे. तो विश्वास सार्थ ठरवून भक्ताने चातुर्मासात देवाला स्मरून प्रत्येक कार्य करावे आणि देवाला समर्पित करावे. 

अशा काळात मनुष्य जर मंगल कार्यात अडकून राहिला, तर जबाबदारी पूर्ण करणार कधी? तसेच या काळात निसरडे रस्ते, धुसर वातावरण, वादळी वारा यात अपघात होऊ नये आणि मंगलकार्यात विरजण पडू नये, म्हणूनही मंगलकार्य टाळले आहे. 

ही दूरदृष्टी पाहिल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांचा, संस्कृतीचा आणि धर्माचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण आपली जबाबदारी ओळखून परमेश्वर आणि परिस्थितीवर अवलंबून न राहता कर्मावर भर दिला पाहिजे, हाच या उत्सवाचा हेतू आहे. 

यंदाचा अधिक मास : २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण महिना अधिक आहे. बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी संपेल.

टॅग्स :marriageलग्न