शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्ष गुरुवार २०२५: आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार, त्यानिमित्ताने 'असे' करा देवीला कुंकुमार्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 07:00 IST

Margashirsha Thrusday 2025: आज महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्याआधी देवीला कुंकुमार्चन करा, त्यासाठी जाणून घ्या योग्य विधी!

मार्गशीर्षातल्या गुरुवारी (Margashirsha Guruvar 2025) महालक्ष्मीचा मुखवटा बसवून त्याचे पूजन केले जाते. याच बरोबर कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन इ. परंपरेला महत्त्व आहे. देवीची कृपादृष्टी व्हावी, म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन. आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. त्यानिमित्ताने कुंकुमार्चन अवश्य करा. यासंदर्भांत पालघर येथील ज्योतिषतज्ञ राणे गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे, ती जाणून घेऊ. 

महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार, मार्गशीर्षाचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा.  

कुंकुमार्चन पूजा विधी :- 

एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)

मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!

त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.

‘मूळ कार्यरत शक्तीलतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीकतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या  सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

English
हिंदी सारांश
Web Title : Margashirsha Thursday 2025: Perform Kumkumarchan to the Goddess on final Thursday.

Web Summary : On the last Margashirsha Thursday, devotees perform Kumkumarchan to Mahalakshmi for blessings. This involves offering kumkum while chanting the Goddess's name, activating her divine presence in the idol. Special days like Purnima and Navratri are ideal for this ritual, bringing prosperity and fulfilling desires.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण