शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi December 2022: मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: ‘अशी’ करा गणपती बाप्पाची पूजा; महत्त्व आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 14:40 IST

Sankashti Chaturthi December 2022: सर्वांत शुभ मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या, विविध शहरांतील चंद्रोदय वेळा...

Margashirsha Sankashti Chaturthi December 2022: मराठी वर्षातील सर्वांत पवित्र आणि शुभ मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरु आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार, ११ डिसेंबर रोजी आहे. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. डिसेंबर महिन्यातील मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि बाप्पाच्या पूजेची सोपी पद्धत जाणून घ्या... (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Date)

प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा.

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: रविवार, ११ डिसेंबर २०२२  

मार्गशीर्ष वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजून १४ मिनिटे.  

मार्गशीर्ष वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, १२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजून ४८ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Vrat Puja Vidhi In Marathi)

गणपती बाप्पाच्या पूजनाची सोपी पद्धत  

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Chandrodaya Timing)

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ४५ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती