शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi December 2021: सन २०२१ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, सोपी पद्धत आणि चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 14:03 IST

Margashirsha Sankashti Chaturthi December 2021: सन २०२१ मधील शेवटची, मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताची सोपी पद्धत आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

सन २०२१ वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. धार्मिकदृष्ट्या शुभ आणि लाभदायक मानला जाणारा मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेश उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे विशेष असते. हजारो भाविक दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन, उपवास, नामस्मरण करत असतात. सन २०२१ मधील शेवटची, मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे. बुधवारी केल्या जाणाऱ्या गणपती पूजनाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची सोपी पद्धत, मुहूर्त आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (Margashirsha Sankashti Chaturthi December 2021)

यंदाची शेवटची संकष्ट चतुर्थी: बुधवार, २२ डिसेंबर २०२१

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: बुधवार, २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०४ वाजून ५२ मिनिटे.

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी समाप्ती: गुरुवार, २३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०६ वाजून २६ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण बुधवार, २२ डिसेंबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. 

‘असे’ करावे व्रताचरण

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीला अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करावा आणि त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री आपापल्या ठिकाणची स्थानिक चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. या दिवशी गणपती बाप्पाची स्तोत्रे म्हणावीत. स्तोत्र पाठ नसतील तर 'नमो भगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा. संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी, असे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ४७ मिनिट
सातारारात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ३३ मिनिट
वर्धारात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून २७ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ३२ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून १९ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
मालवणरात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे 
इंदौररात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ११ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी