शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या १२ नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:30 IST

Margashirsha Guruvar 2024: ५ डिसेंबर रोजी महालक्ष्मी व्रत केले जाईल, त्याआधी या व्रताला पूरक १२ नियम जाणून घ्या!

बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते, तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी, यासाठी मार्गशीर्षातल्या गुरुवारी (Margashirsha Guruvar 2024) महालक्ष्मीचे व्रत (Mahalaxmi Vrat 2024) केले जाते. ते व्रत कसे करायचे, पूजा कशी करायची याबद्दल माहिती दिलेली आहेच. त्याबरोबरीने इतर महत्त्वाचे नियमही जाणून घ्या. 

Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!

>>  रोजच्या देवपूजेच शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा. कारण, शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे. 

>> लक्ष्मीमातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल. म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी. त्यामुळे धन वृद्धी होते.

>> लक्ष्मी माता कमळात विराजमान असते. ते तिचे आवडते स्थान आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे, गुलाबी कमळ अर्पण करावे.

>> महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे साखर, दही साखर किंवा खडीसाखरदेखील चालू शकेल.

>> एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे. श्रीफळ हे समृद्धीचे द्योतक आहे.

>> तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम! देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे.

>> वैजयंती फुलदेखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते. भक्तीभावाने हे फुल अर्पण केले असता, देवीची कृपादृष्टी लाभते. 

>> केळ्याची बाग जिथे असते, तिथे आर्थिक चणचण भासत नाही. परंतु, प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते, तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा.

>> ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. 

>> रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते, म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा. ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते.

>> अस्ताव्यस्त, पसरलेले घर आपल्याला आवडत नाही, तर देवीला तरी कसे आवडणार? म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले आणि नीटनेटके असाव़े  अशा घरात देवी मुक्तहस्ते आशीर्वाद देते.

>> जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते, त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी