शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

षटतिला एकादशीला तिळाचे दान करून विष्णूंच्या पाच मंत्रांचा जप अवश्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:13 IST

विष्णू पूजा करताना एकादशीच्या उपासाला उपासनेची जोड द्या!

२८ जानेवारी रोजी षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी तिळाचे दान केले जाते. असे मानले जाते की तिळाचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते, सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. यासाठी विष्णू पूजेला जोड द्या भगवान  श्लोकांची!

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् , विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् | लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् , वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ||

अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 

अर्थ : भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् | करोमि यद्यत् सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||

अर्थ : आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.

ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू: प्रचोदयात।।

याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.

'ओम नमो भगवते वासुदेवाय'

सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.