शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आमलकी एकादशीला धनप्राप्तीसाठी आणि भाग्योदयासाठी करा सोपे पण महत्त्वाचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:17 IST

विवाहित महिलांसाठी आमलकी एकादशी खास आहे. वैवाहिक मतभेद दूर होऊन आयुष्य आनंदी व्हावे यासाठी आमलकी एकादशीचे व्रत पाळावे.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आगामी एकादशी महत्त्वाची आहे. तिचे नाव आहे आमलकी एकादशी. १४ मार्च रोजी ही तिथी आहे. त्या दिवशी ग्रहस्थिती अनुकूल असल्याने धनप्राप्ती आणि भाग्योदयासाठी केलेली उपासना फलद्रुप होऊ शकते असे ज्योतिषांचे सांगणे आहे. त्यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा कशी करावी व कोणते उपचार करावे ते जाणून घेऊ. 

धनवृद्धीचा मिळेल आशीर्वाद 

आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू-माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असलेल्या आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. म्हणून तिला आमलकी एकादशी म्हणतात. आवळ्याच्या झाडावर त्या दोहोंचा वास असतो असे मानतात. त्यामुळे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. घरात सुबत्ता नांदते. या दिवशी उपास केला जातो तसेच पुढील उपायही केले जातात. 

>>आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना २१ ताज्या पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. पूजेनंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा. 

>>आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करून देवीला एक नारळ अर्पण करावा. पूजेनंतर हा नारळ किमान आठवडाभर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीजवळ ठेवा, काही काळाने आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.

>>आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याचे सेवन करा. आवळ्याच्या झाडाच्या छायेत रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते. 

>>विवाहित महिलांसाठी आमलकी एकादशी खूप खास आहे. जर काही कारणाने पती-पत्नीमध्ये वाद झाला असेल किंवा पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर पत्नीने या दिवशी आवळा किंवा करवंदाच्या झाडाची पूजा करून झाडावर कापसाची सात वस्त्रे घालावीत तुपाचा दिवा लावावा.