शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

Makarsankranti 2022 : सूर्याचे तेज आणि शनिदेवाची कृपा हवी असेल तर मकर संक्रांतीला करा 'हा' उपाय, बदलेल भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:42 IST

Makarsankranti 2022: तब्बल २९ वर्षांनंतर यावेळी मकर संक्रांतीला शनि आणि सूर्याची समक्ष भेट होणार आहे. हा सुंदर योग सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी विशेष आहे. शास्त्रानुसार प्रसंगी काही विशेष कार्य केलेच पाहिजे. काय करता येईल जाणून घ्या.

वर्षातील सर्व संक्रांतीत मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव याची राशी बदलते. सूर्याच्या राशी बदलाने मंगळाचे कार्य सुरू होते. यावेळी मकर संक्रांतीला सूर्याचा दुर्मिळ योगायोग होत आहे. खरे तर यावेळी १४ जानेवारीला २९ वर्षांनंतर शनि आणि सूर्याची भेट होणार आहे. अशा स्थितीत या दिवशी काही विशेष काम केल्याने सूर्य आणि शनीची विशेष कृपा प्राप्त होते. ज्यामुळे जीवन आनंदी होते. जाणून घ्या मकर संक्रांतीला कोणते काम करावे.

सूर्योदयापूर्वी स्नान कराशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. असे मानले जाते की सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने १० हजार गायी दान करण्याइतके पुण्य मिळते. कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक असले तरी प्रयागराज संगमात स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय या दिवशी गंगास्नान केल्यानेही खूप फायदा होतो. जर कोरोनामुळे नद्यांमध्ये आंघोळ करणे शक्य नसेल तर घरच्या आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब मिसळून स्नान करू शकता आणि तेही शक्य नसेल तर अंघोळ करताना पवित्र नद्यांचे स्मरण करा, जेणेकरून साधे पाणीदेखील गंगेसमान पवित्र होईल. मुख्य मुद्दा काय, तर पाणी महत्त्वाचे नाही तर सूर्योदयापूर्वी स्नान महत्त्वाचे आहे. सूर्योदयापूर्वी स्नान का करायचे? कारण हा सूर्यदेवाप्रती कृतज्ञ भाव दर्शविण्याचा प्रकार आहे. जो सूर्य ३६५ दिवस न थकता आपण उठण्याआधी येतो आणि आपल्याला उठवतो, त्या सूर्याच्या सणाच्या दिवशी तरी निदान लवकर उठून, आवरून त्याचे स्वागत केल्यास त्याचा आशीर्वाद नक्कीच मिळू शकेल. 

सूर्यदेवाची पूजामकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले आणि काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. यादरम्यान ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल. पुराणानुसार सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख-समृद्धी तसेच दीर्घायुष्य मिळते.

तीळ आणि गुळाचे दानपद्म पुराणानुसार सूर्याच्या उत्तरायणात केलेले कार्य अक्षय असते. अशा स्थितीत या दिवशी पितरांना अर्घ्य देणे आणि देवतेची पूजा करणे पुण्याचे मानले जाते. याशिवाय या दिवशी काळी चादर, लोकरीचे कपडे, तीळ-गूळ आणि खिचडी दान करणे शुभ आहे. यामुळे शनिदेव आणि भगवान सूर्याचा विशेष आशीर्वाद मिळतो.

सूर्य आणि शनीची कृपा मिळविण्यासाठी हे काम करामकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीचा शासक ग्रह शनि आहे, जो सूर्य देवाचा पुत्र आहे. या दोहोंची कृपा व्हावी म्हणून या दिवशी तिळाचे सेवन आणि दान करावे. याशिवाय तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन अवश्य करावे. व शास्त्र सांगते त्याप्रमणे सर्वांशी गोड बोलावे म्हणजे सूर्यदेव आणि शनिदेवासकट सगळ्यांचीच कृपादृष्टी कायम राहते!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती