शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:15 IST

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो. शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या...

Makar Sankranti 2025 Date And Time: सन २०२५ मधील पहिला मोठा सण म्हणजे मकरसंक्रांती. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, बाजारात पतंग, सुगड, तिळगूळाचे सामान, वाण सामान यांचा भरणा सुरू होतो. मकरसंक्रांतीची लगबग सुरू होते. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. सन २०२५ मध्ये मकरसंक्रांती कधी आहे? मकरसंक्रांतीला येणारे शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते, असे नाही. वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात. रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. त्यामुळेच मकरसंक्रांतीला तिळगूळ खाण्याला महत्त्व असते. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात, एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.

मकरसंक्रांती: १४ जानेवारी २०२५

संक्रमण पुण्यकाल: सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटे ते सायंकाळी ०४ वाजून ५४ मिनिटे.

अभिजित मुहूर्त: दुपारी १२ वाजून ०९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५१ मिनिटे.

विजय मुहूर्त: दुपारी ०२ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ०२ वाजून ५७ मिनिटे.

गोधूली मुहूर्त: सायंकाळी ०५ वाजून ४३ मिनिटे ते ०६ वाजून १० मिनिटे.

अमृत ​​काल: सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटे ते ९ वाजून २९ मिनिटे.

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते.  मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण, पोंगल इत्यादी नावांनी ओळखला जातो. सर्वसाधारणपणे मकरसंक्रांती १४ जानेवारी रोजी येते. भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत होय. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो. अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकरसंक्रांत म्हणून साजरे करतो. सध्या १४-१५ जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आहे. यंदाच्या मकरसंक्रातीला पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे. 

संपूर्ण भारतात मकरसंक्रमण साजरे केले जाते मकर संक्रमणापेक्षा उत्तरायण आरंभ ही या सणाची मुलभूत संकल्पना आहे. सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो.  थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळ-गूळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे, काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरु झाल्या. कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकलेले धान्य, फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरु झाले. लोहडी (पंजाब ), भोगाली बिहु (आसाम), खिचडी संक्रांत (बिहार). पौष संक्रान्ति (बंगाल), पोंगल(तमिळनाडू), मकर वल्लाकु (केरळ) अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मकरसंक्रमण साजरे केले जाते. या काळात स्नान, दान-धर्म आदी कार्ये शुभ मानली जातात.

दरम्यान, महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करतात. १३ तारखेला भोगी, १४ तारखेला संक्रात आणि १५ तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते. संक्रांत म्हणजे संक्रमण. ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकरसंक्रातीला दान करणे, गंगा स्नान करणे शुभ मानले गेले आहे.

 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीspiritualअध्यात्मिक