शहरं
Join us  
Trending Stories
1
राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप
2
ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
3
'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले
4
संजय बांगरचा मुलगा लंडनमध्ये झाली मुलगी 'अनया'! मुलगा असताना असं होतं क्रिकेटचं रेकॉर्ड
5
चैत्र गुरु प्रदोष: शिव होतील प्रसन्न, गुरुचे मिळेल पाठबळ; कसे करावे व्रत? पाहा, सोपी पद्धत
6
झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...
7
महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू
8
नौदलालाही राफेलची ताकद मिळणार! ६४००० कोटींच्या डीलला मंजुरी, किती विमाने अन् कधीपर्यंत येणार...
9
षष्ठग्रही ६ राजयोगात गुरुवारी प्रदोष: ६ राशींवर धनलक्ष्मी कृपा, सर्वोत्तम काळ; शुभ-लाभ!
10
मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी
11
VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद
12
डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे
13
आता अमेरिकेच्या निशाण्यावर फार्मा सेक्टर, मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत ट्रम्प; भारताचं टेन्शन वाढणार!
14
स्वस्त होतंय असं म्हणताच सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, खदेरीपूर्वी पाहा Gold-Silver चे लेटेस्ट रेट
15
पत्नी करतेय छळ तर तुम्हीही करू शकता तक्रार; कायद्याने पतीला काय दिलेत अधिकार?
16
'भारत एकमेव देश, जो अमेरिकेसोबत...' डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर जयशंकर स्पष्टच बोलले
17
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची चकमक, तीन दहशतवाद्यांना घेरले; गोळीबार सुरूच
18
लफड्याला वय नसतं! खळखळून हसवणारा 'गुलकंद'चा धमाल ट्रेलर, समीर-सईच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा
19
VIDEO: या बाबतीत अजिबात तडजोड नाही; एकाच ड्रेससाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी
20
क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

Mahaveer Jayanti 2025: एक अट्टल गुन्हेगार भगवान महावीरांच्या प्रेरणेने सन्मार्गी लागला, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:00 IST

Mahaveer Jayanti 2025: १० एप्रिल रोजी महावीर जयंती आहे, त्यानिमित्त भगवान महावीरांच्या छोट्याशा उपदेशामुळे एका गुन्हेगाराच्या आयुष्यात केवढा मोठा बदल घडला ते पाहू.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवान महावीर एका गावात आपल्या शिष्यांसह आले. लोकांना ते भक्तीमार्ग समजावून सांगत. त्यांच्या अनमोल वचनांमुळे कित्येकांनी चांगला मार्ग स्वीकारला. त्या गावात एक चोर होता. त्याला महावीरांचा उपदेश आवडत नसे. त्याच्या बरोबरीने चोरी करणारे अनेक चोर आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सोडून महावीराच्या उपदेशाप्रमाणे आचरण करू लागले होते. त्यामुळे तो जिथे महावीर असतील तिथे थांबत नसे. 

एके दिवशी तो चोर भयंकर आजारी पडला. त्यावेळी त्याने आपल्या मुलाला बोलवून सांगितले, `हे बघ बाळ, मी आता जास्त दिवस जगेन असे वाटत नाही. माझ्यामागे तू आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला चोरीचा धंदा पुढे असाच चालू ठेव. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जोपर्यंत महावीर आहेत, तोपर्यंत त्यांच्याजवळ फिरकू पण नकोस. ते जिथे असतील तिथून दूर निघून जा.

थोड्याच दिवसाने चोराने शरीर सोडले. त्याचा मुलगा पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चोरीचा व्यवसाय करून निष्णात चोर बनला. बरीच संपत्ती त्याने जमवली. 

एके दिवशी मात्र महावीरांच्या मठाजवळून जाताना त्याला महावीरांचे दर्शन झाले. महावीर जमलेल्या भाविकांना उपदेश करत होते. चोराच्या मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे महावीरांच्या मठाजवळ न थांबता तिथून तो पळत सुटला. त्यांचा उपदेश कानावर पडू नये म्हणून कान बंद करून घेतले. तरीही अर्धे वाक्य त्याच्या कानावर पडलेच. महावीर मृत्यूनंतरच्या अवस्थेचे वर्णन करत असताना म्हणत होते की, 'शरीरातील प्राण घेऊन जाणारे यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात', एवढे वाक्य मात्र ऐकले, पुढचे वाक्य ऐकू येऊ नये म्हणून त्याने कान बंद केले नि तो तिथून पळत सुटला.

एके दिवशी सावकाराच्या वाड्यावर मोठा दरोडा पडला. राजाच्या सैनिकांनी संशयीत म्हणून चोराच्या मुलाला पकडून नेले. चोरी त्यानेच केली होती. परंतु तो कबुल होईना. नाना प्रकारे त्याला कबुल करायवयास लावले, पण व्यर्थ! शेवटचा उपाय म्हणून त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. सात आठ दिवस बेशुद्ध ठेवल्यावर तो अर्धवट शुद्धीवर आला. तो मरण पावला आहे, असे भासवण्यासाठी त्याच्या भोवती पाच सहा सुंदर स्त्रिया जमवल्या, त्या म्हणाल्या, `आम्ही यमराजाच्या सेविका आहोत. तुझा प्राण आम्ही घेऊन जात आहोत. तू तुझ्या जीवनात जे काही दुष्कर्म केले असेल ते खरंखरं सांगितलं तर तुला आम्ही स्वर्गात नेऊ आणि खोटं सांगितलं तर तुझी नरकात रवानगी करू.'

आपल्याकडून चोरीची कबुली करून घेण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल! अशी त्याला शंका आली. तेवढ्यात त्याला महावीरांचे वाक्य आठवले. महावीर म्हणाले होते, की 'यमराजांच्या सेवकांचे पाय उलटे असतात.' परंतु यांचे पाय तर आपल्यासारखेच आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला शिक्षा करण्यासाठी हे कारस्थान आहे. हे त्याने जानले. परंतु वरकरणी काहीही न दर्शवता तो म्हणाला, `तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही स्वर्गात जायची खूप इच्छा आहे. पण मी एकही दुष्कर्म केलेले नाही.'

राजाचा हा प्रयत्नही व्यर्थ ठरला. काहीही पुरावा नसल्याने राजाला त्याला सोडून द्यावे लागले. केवळ महावीरांच्या अध्र्या वाक्यामुळे त्याची शिक्षा टळली. त्याने विचार केला, की महावीरांचे अर्धे वाक्य जर आपल्याला कारावासाच्या बंधनातून मुक्त करू शकले, तर त्यांचा पूर्ण उपदेश जर ऐकला, तर जीवन खऱ्या अर्थाने मुक्त होईल. नंतर तो त्वरित महावीरांना शरण  गेला. त्याने सारी हकीगत त्यांना सांगितली आणि त्यांचा अनुग्रह घेतला व आपले जीवन सुखी केले. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी