शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घरात शंकर प्रतिमा वा शिवलिंग नाही? मग महाशिवरात्रीचे व्रत कसे कराल? पाहा, पर्याय अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:12 IST

Mahashivratri 2025: प्रत्येक घरात शिवलिंग, शिवमूर्ती किंवा शिवाची प्रतिमा असतेच, असे नाही. पण व्रत करायची इच्छा असते. अशा परिस्थितीत भाविकांसमोर काय पर्याय आहेत?

Mahashivratri 2025: बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०८ वाजून ५४ मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री शिवपूजन करावे, असे सांगितले जात आहे. परंतु, घरात शंकराची प्रतिमा किंवा शिवाची पिंडी नसेल, तर मग महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? यासाठी काही उपाय आणि पर्याय सांगितले गेले आहेत.

प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. या दिवशी संपूर्ण देशभरातील शिव मंदिरात जाऊन भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक, विशेष शिवपूजन, उपासना, मंत्रांचे जप करत असतात. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची ३ अंगे आहेत. मात्र, अनेकांच्या घरात शिवलिंग, शिवमूर्ती किंवा शिवाची प्रतिमा असतेच, असे नाही. पण व्रत करायची इच्छा असते. अशा परिस्थितीत भाविकांसमोर काय पर्याय आहेत? 

कलियुगात नामस्मरण ही साधना 

कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. 'कलियुगी नामची आधार', असे संतांनी सांगितले आहे. नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना; तसेच ते नाम ऐकताना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. याप्रमाणे नामजप करताना तो एकाग्रतेने करावा, असे सांगितले जाते. 

'ॐ नमः शिवाय।' हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करू शकतो

शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. यांपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा 'ॐ नमः शिवाय।' हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करू शकतो. तसेच 'स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ', हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. जसे साध्या बॉम्बपेक्षा अणुबॉम्ब आणि त्यापेक्षा परमाणू बॉम्ब हा अधिक शक्तिशाली असतो, त्याप्रमाणे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींमध्ये अधिक सामर्थ्य असते. या तत्त्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणे शक्य नसल्यास शिवाची मानसपूजाही करू शकतो. 'ॐ नमः शिवाय।' हा नामजप अधिकाधिक करा, असे म्हटले जाते. 

महाफलदायी महाशिवरात्री व्रत

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जत नसेल त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्प करुन झाल्यावर शंकराचे आवाहन करावे. शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. 

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक