शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

महाशिवरात्री: म्हणा शिवस्तुती अन् ‘या’ मंत्रांचा जप करा; दुप्पट लाभ मिळवा; पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:52 IST

Mahashivratri 2024: महादेवांशी संबंधित अनेक स्तोत्रे, मंत्र, श्लोक यांचे नित्यनेमाने घरोघरी पठण, श्रवण केले जाते. पैकी शिवस्तुती स्तोत्र जाणून घ्या...

Mahashivratri 2024: मराठी वर्षांत महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी लाखो शिवभक्त मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेतात. जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाचे नामस्मरण करणे, उपासना करणे, जपजाप करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस विशेष सर्वोत्तम मानला जातो. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय असते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरते, असे मानले जाते. 

०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचे व्रत कोणीही करू शकते. वास्तविक पाहता, लाखो घरांमध्ये नित्यनेमाने दररोज शिवमंत्र, श्लोक, स्तोत्रे म्हटली जातात. शिवसंबंधीत रचनांचे पठण, श्रवण केले जाते. मात्र, काही मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे जप, पठण किंवा श्रवण महाशिवरात्रीला करणे शुभ पुण्यदायी मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा, असे सांगितले जाते. 

ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

असा मंत्र म्हणून व्रतपूजनाचा संकल्प करावा. शिवाची मनोभावे षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक करावा. पूजाविधी झाल्यानंतर ।। ॐ नमः शिवाय।। या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.

शिवाचा गायत्री मंत्र

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात।

महादेव शिवशंकराचा गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे. शिवपुराणात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभलाभदायक मानले जाते. या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. मात्र, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. 

महामृत्यूंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

महादेव शिवनाथांचा महामृत्यूंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती या मंत्राचा जप करावा. मात्र, या मंत्राचा जप करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे मानले जाते. या मंत्राचा जप करण्यापूर्वी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा. जप पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा. यासह जप करताना मंत्रोच्चारण सुस्पष्ट असावे, असे काही नियम सांगितले जातात. अनेक ऋषी, संत-महंत, कवी, दिग्गज रचनाकारांनी महादेवांवर रचना केल्याचे आढळून येते. शंकराची शिवस्तुति, शिवमहिम्न स्तोत्र, रुद्र, शिवचालिसा, रुद्राष्टकम्, शिवतांडव, लिंगाष्टकम्, शिवमानस पूजा, शिवलीलामृत यांसह अन्य मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे केलेले पठण शुभफलदायी ठरू शकते. पठण शक्य नसेल, तर मनोभावे, एकचित्ताने श्रवण करावे, असे म्हटले जाते. 

श्री शिवस्तुति

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥

रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥

जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।गंगा शिरीं दोश्ह महाविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६॥

कर्पूरगौरीं गिरिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७॥

स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।उदासमूर्तीं जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८॥

भूतादिनाथ अरिअंतकाचा । तो स्वामि माझा  ध्वज शांभवाचा ।राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९॥

नंदी हराचा हर नंदिकेश । श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १०॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।तो रुद्र विश्वंभर दक्श मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११॥

इच्च्हा हराची जग हें विशाळ । पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या ।मंदाकिनी मंगल मोक्शकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥

कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ।एकाग्रनाथ विश्ह अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥

सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।अंतीं स्वहीत सुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥

विराम काळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥

सुखावसाने सकळें सुखाचीं । दुःखावसाने टळती जगाचीं ।देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥

अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥

शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥

जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिलिंग ।गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥

जाई जुई चंपक पुश्ह्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥

अलक्श्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।नेई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।पंचाक्शरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ।शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥

काळाचें भय मानसीं धरुं नको दुश्ह्टांस शंकूं नको ।ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥

॥ हर हर महादेव ॥

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक