शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:02 IST

Mahalaxmi Vrat Udyapan Vidhi 2025: मार्गशीर्षात दत्त उपासना आणि महालक्ष्मी व्रत उपासना केली जाते, १८ डिसेंबर रोजी या व्रताचे उद्यापन करायचे आहे, विधिवत पूजा जाणून घेऊ. 

Margashirsha Guruvar Udyapan Vidhi: मार्गशीर्ष महिना दत्त गुरूंचा. दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवारी(Margashirsha Guruvar 2025) आपण दत्त उपासना केली. त्याबरोबरच वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, भरभराट देणारे महालक्ष्मी व्रत केले, त्याचे उद्यापन करण्याची वेळ अर्थात मार्गशीर्षाचा चौथा गुरुवार १८ डिसेंबर रोजी येत आहे, ही पूजा विधिवत कशी करावी, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!

मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. यंदा या व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी सुरु होत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे, त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ! 

'श्रीमहालक्ष्मीव्रत' या पोथीत लेखक द. शं. केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख, शांती, धन-संपत्ती व श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री-पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत पूजाविधीसह करावे. महालक्ष्मीव्रताची कथा व माहात्म्य वाचावे. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्रीमहालक्ष्मीव्रतकथा व माहात्म्य ह्यांचे वाचन करावे. व्रताचे उद्यापनाचे दिवशी आठ सुवासिनींना अगर आठ कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मीस्वरूप समजून तिला हळदकुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच ह्या व्रताचे उद्यापन. 

Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 

मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी (एकादशी, अमावास्या असली तरीही) व्रताचे उद्यापन करावे. व्रताचे दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे. काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये.

ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल, त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथीश्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथीवाचनाचे वेळी, महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल.

Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय

मार्गशीर्ष गुरुवार (Margashirsha Guruvar 2025) व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी (दि. १८/१२/२०२५) उद्यापन (Mahalaxmi Vrat Udyapan 2025) करावे, असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी, अशी माहिती अशोक कुलकर्णी यांनी दिली आहे. 

यंदा शेवटच्या गुरुवारी अमावस्या प्रारंभ होत असल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षात सोशल मीडियाचा वापर अति प्रमाणात झाल्याने, काही जण चुकीची माहिती प्रसारीत करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे १८ डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahalakshmi Vrat Udyapan: How to Conclude the Fast on December 18th

Web Summary : Conclude your Mahalakshmi Vrat on December 18th with traditional rituals. Invite eight women, offer them haldi-kumkum and the pooja book. Fast during the day, eat sweets at night, and dispel any doubts about the Amavasya.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण