बायकांच्या पोटात काही राहत नाही, अशी शेरेबाजी नेहमी कानावर पडते. त्याला कारणही तसेच आहे. बायका शापित आहेत, त्यांना हा शाप कोणी दिला आणि कशामुळे दिला याची गोष्ट प्रेमानंद महाराजांनी सांगितली.
August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!
ते म्हणतात, 'महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर सर्व मृत नातेवाईकांचे श्राद्धविधी करत होता, तेव्हा त्याची आई देवी कुंती हिने युधिष्ठिराला दानशूर कर्ण याचेही श्राद्ध करण्यास सांगितले. शास्त्रानुसार हे कर्म केवळ आप्तजनांचे केले जाते, मग आईने केलेली आज्ञा आणि त्यामागे कारण काय असे युधिष्ठिराने विचारले. त्यावर देवी कुंती म्हणाली, कर्ण अनाथ नसून तो तुमचा मोठा भाऊ आणि माझा मोठा मुलगा होता.
हे ऐकताच युधिष्ठिराला धक्का बसला. आपण ज्याला शत्रू समजत होतो तो आपला मोठा भाऊ होता, हे कळल्यावर त्याला युद्धप्रसंग, मानहानीचे प्रसंग, वादाचे प्रसंग आठवले. युधिष्ठिर आपल्या आईला म्हणाला, 'आई हे गुपित तू लपवून ठेवण्याआधी जर वेळीच सांगितले असते, तर मी आमच्या मोठ्या भावाचे पाय धरून माफी मागितली असती आणि एवढे मोठे युद्ध टळले असते. जीवितहानी झाली नसती. नात्यांवरचा विश्वास उडाला नसता. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना वैधव्य आले नसते, एवढी बालके अनाथ झाली नसती. हे केवळ तुझ्या मौनामुळे घडले आहे. त्यामुळे मी तुझ्या रूपाने समस्त स्त्री जातीला शाप देतो, की यापुढे कोणाही माता भगिनींच्या पोटी कोणतीही गोष्ट राहणार नाही. जरी राहिली तरी ती कोणा ना कोणाला सांगण्याची उबळ त्यांना येतच राहील आणि त्यांचे गुपित फार काळ गुपित राहणार नाही.
यामुळेच की काय स्त्रिया फार काळ एखादे गुपित पोटात ठेवत नाहीत, कोणा न कोणाला सांगून मोकळे होतात.
यामागील मानस शास्त्र पाहिले तर लक्षात येईल, की स्त्रीच्या मनाची रचना आधीच एवढी गुंतागुंतीची असते की त्यात एखादी गोष्ट लपवून ठेवण्याचे स्किल त्यांना पेलवत नाही आणि म्हणूनच त्या आपल्या मनातल्या गोष्टी जिवलग मैत्रिणीला सांगून मोकळ्या होतात.