शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maha Shivratri 2023 : घरावरील अरिष्ट टळावे, यासाठी महाशिवरात्रीला आठवणीने वापर 'या' वास्तूटिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 14:51 IST

Vastutips for mahashivratri 2023: भगवान शंकर संकट निवारण करणारे, आपल्या घराच्या संरक्षणासाठी महाशिवरात्रीला दिलेले उपाय अवश्य करा. 

माघ वद्य चतुर्दशीला वर्षातील  सर्वात मोठी शिवरात्री साजरी केली जाते, तिलाच आपण महाशिवरात्री असे म्हणतो. या दिवशी मोठ्या उत्साहाने सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. तसेच आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी शिवलिंगावर दूध, चंदन, भस्म, भांग, धोतऱ्याची फुले इत्यादी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. या पूजेलाच जोड द्यायची आहे एका उपासनेची, जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तू दोष मिटतील. ती उपासना कोणती हे जाणून घेउ. 

यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.

महा शिवरात्रीचे उपाय

>> महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे. यानंतर 'ओम नमः शांभवाय च, मायोभवाय च नमः शंकराय च'. या मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.

>> एकाच घरात आपसी कलह, रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. 

>> घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो. 

>> घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. 

>> यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते. 

>> शिवरात्रीच्या दिवशी शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा, तसेच एखाद्या गरज वंताला पोटभर अन्न किंवा शिधा द्यावा. त्यामुळेदेखील वास्तू पीडा कमी होते. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीVastu shastraवास्तुशास्त्र