शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

माघ विजया एकादशी: कसे कराल व्रत? सर्व क्षेत्रात मिळेल यश; लाभेल विष्णूकृपा अपार, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:56 IST

Magh Vijaya Ekadashi February 2025: व्रताचरणाच्या सोप्या पद्धतीसह विजया एकादशीचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या...

Magh Vijaya Ekadashi February 2025: मराठी वर्षातील माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. यंदाचे माघ आणि फेब्रुवारी हे दोन्ही महिने आता सांगतेला आले आहेत. माघ महिन्याची समाप्ती होतानाही अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जाणार आहेत. महाशिवरात्रीचा मोठा सण साजरा करण्यापूर्वी श्रीविष्णूंना समर्पित एकादशी व्रताचे आचरण केले जाणार आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी विजया एकादशी नावाने ओळखली जाते. माघ महिन्यातील एकादशीचा शुभ मुहूर्त, व्रताचरणाची सोपी पद्धत, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. पद्म पुराणानुसार, भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उपदेश करताना सांगितले होते की, एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो, त्याला पुण्यफलप्राप्ती होते. तसेच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळण्याची संधी वाढते, अशी श्रद्धा आहे.

विजया एकादशी: सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५

माघ वद्य एकादशी प्रारंभ: रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५५ मिनिटे.

माघ वद्य एकादशी समाप्ती: सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ४४ मिनिटे.

भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ विजया एकादशीचे व्रत आचरावे, असे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, रामायणात सीता मातेच्या अपहरणानंतर लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केले होते. ब्रह्माजींनी नारदजींना सांगितले होते की, जो साधक या व्रताचे माहात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

माघ विजया एकादशी व्रताचरणाची सोपी पद्धत

विजया एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. 

माघ विजया एकादशी व्रताची सांगता कशी करावी?

विजया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

 

टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक