शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:00 IST

Lunar Eclipse: आकाशात होणारा अद्भुत खेळ आपल्याला चक्रावून टाकतो, येत्या ८ वर्षात चंद्रग्रहणाचे कोणते प्रकार अनुभवता येणार ते जाणून घेऊ. 

>>प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ ते २०३३ या काळात एकूण २० चंद्रग्रहणे(Lunar Eclipse 2025) होणार आहेत. यामध्ये छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास अशा तिन्ही प्रकारची ग्रहणे समाविष्ट आहेत. या ग्रहणांपैकी काही भारतातून दिसतील तर काही फक्त इतर देशांतूनच पाहायला मिळतील.

चंद्रग्रहणाचे प्रकार :

छायाकल्प (Penumbral Eclipse): चंद्र पृथ्वीच्या हलक्या छायेत येतो.

खंडग्रास (Partial Eclipse): चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद छायेत येतो.

खग्रास (Total Eclipse): पूर्ण चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत शिरतो आणि लालसर दिसतो.--------------येणारी महत्त्वाची चंद्रग्रहणे१) ७ सप्टेंबर २०२५ – खग्रास, भारतातून दिसेल.२) ३ मार्च २०२६ – खग्रास, भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.३) २८ ऑगस्ट २०२६ – खंडग्रास, भारतातून दिसणार नाही.४) २० फेब्रुवारी २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसेल.५) १८ जुलै २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसेल.६) १७ ऑगस्ट २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.७) १२ जानेवारी २०२८ – खंडग्रास, भारतातून दिसणार नाही.८) ६ जुलै २०२८ – खंडग्रास, भारतातून दिसेल.९) ३१ डिसेंबर २०२८ – खग्रास, भारतातून दिसेल.१०) २८ जून २०२९ – खग्रास, भारतातून दिसणार नाही.११) २० डिसेंबर २०२९ – खग्रास, भारतातून दिसेल.१२) १५ जून २०३० – खंडग्रास, भारतातून दिसेल.१३) ९ डिसेंबर २०३० – छायाकल्प, भारतातून दिसेल.१४) ७ मे २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.१५) ५ जून २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.१६) ३० ऑक्टोबर २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.१७) २५ एप्रिल २०३२ – खग्रास, भारतातून दिसेल.१८) १८ ऑक्टोबर २०३२ – खग्रास, भारतातून दिसेल.१९) १४ एप्रिल २०३३ – खग्रास, भारतातून दिसेल.२०) ८ ऑक्टोबर २०३३ – खग्रास, भारतातून दिसेल.--------------------भारतासाठी खास!२०२५ ते २०३३ दरम्यान भारतातून १२ ग्रहणे दिसणार आहेत. यामध्ये ८ खग्रास किंवा खंडग्रास आहेत, जे खगोलप्रेमींसाठी अत्यंत आकर्षक ठरणार आहेत. विशेषतः ७ सप्टेंबर २०२५, ३१ डिसेंबर २०२८, २५ एप्रिल २०३२ आणि ८ ऑक्टोबर २०३३ ही खग्रास चंद्रग्रहणे सर्वाधिक रोमहर्षक ठरणार आहेत.-----------------खगोलशास्त्र प्रेमींसाठी ही एक सोन्याची संधी असून आकाशातील हा अप्रतिम देखावा नक्की अनुभवावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणAstrologyफलज्योतिष