शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Lunar Eclipse 2022: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी करा विधिवत लक्ष्मीपूजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:58 IST

Lunar Eclipse 2022: धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले गेले असले तरी या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभतो.

हिंदू नवं वर्षातले पहिले चंद्र ग्रहण १६ मे रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही आणि त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. सुतक काळात अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानल्या जातात. त्यांचे पालन केले नाही  तर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम जीवनावर होतो असा अनेकांचा अनुभव आहे. ज्योतिष शास्त्राने या काळात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय दिले आहेत. ते केले असता आर्थिक समस्या दूर होतील असा दिलासाही ज्योतिष शास्त्राने दिला आहे. 

चंद्रग्रहणाच्या दिवशी करा लक्ष्मीची पूजा : 

चंद्रग्रहणाच्या दिवशी सायंकाळी आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करावे. नंतर उत्तरेकडे तोंड करावे. एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा ओंकार कुंकवाने रेखाटावा. त्यावर लक्ष्मीची प्रतिमा किंवा देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. त्याभोवती फुलांची आरास करावी. बाजूला मुठभर तांदूळ ठेवून त्यावर शंख ठेवावा व त्याला कुंकू लावावे. तुपाचा दिवा लावावा. देवीला कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आपली इच्छा व्यक्त करावी आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करावी-

 सिद्धि बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ति प्रदायिनी, पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते' 

या मंत्राचा जप करावा. चंद्रग्रहण संपल्यावर देवीची प्रतिमा जागेवर ठेवून निर्माल्य काढून घ्यावे आणि शंखाखालचे चिमूटभर तांदूळ तिजोरीत ठेवावेत आणि बाकीचे रोजच्या धान्यात मिसळून टाकावेत. या पूजेनिमित्त एखाद्या गरजूला दान, दक्षिणा, शिधा द्यावा. त्यामुळे लक्ष्मीचा वरद हस्त लाभतो आणि आर्थिक समस्या दूर होतात असा भाविकांचा अनुभव आहे. 

चंद्रग्रहणाचा काळ :

१६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात सकाळी ८. ५९ ते १०. २३  पर्यंत राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ मानला जाणार नाही. हे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. यानंतर पुढील चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण