शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 04:41 IST

जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन!

- प्रल्हाद वामनराव पैमित्रांनो, आपण, मी स्वत:, जीवनतत्त्व, शिल्पकलेचे ज्ञान, उपकरणे, इच्छा, कल्पकता आणि प्रयत्न हे जीवनशिल्पाचे सात महत्त्वाचे घटक थोडक्यात जाणून घेतले. यातील कुठला घटक महत्त्वाचा बरं? अर्थात सगळेच महत्त्वाचे आहेत. आपल्या जीवनातील त्यांचं महत्त्व ओळखून, त्या सर्वांचा योग्य तो वापर करून, योग्य ती काळजी घेऊन आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया! यशस्वी जीवन म्हणजे काय? जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन!मुलांनो, आपण एकट्याने काहीच करू शकत नाही. साधा विचार यायलासुद्धा काहीतरी माध्यम लागतंच! म्हणजे स्वत:चे जीवनशिल्प घडवत असताना इतरांची मदत ही लागतेच आणि आपण स्वत: यशस्वी जीवन जगतो, तेव्हा त्याचे चांगले परिणाम स्वत:सहित कुटुंब, समाज पर्यायाने देशावरदेखील होत असतात. म्हणून मित्रांनो, आताच ध्येय ठरवा! इच्छा व्यापक करा! चला, स्वत:सोबत आपल्या देशाचाही विचार करूया. उद्याच्या समृद्ध भारतात माझंही योगदान असेल, हा विचार धरून त्यादृष्टीने ज्ञान संपादन करूया. कारण देशाचे, समाजाचे आपल्यावर असलेले अनंत ऋ ण आपल्याला फेडायचे आहेत.आपलं यशस्वी जीवनशिल्प निश्चितच आकाराला येणार आहे, या सकारात्मक विचाराने वाटचाल करूया. ते आकाराला येण्यासाठी कारणीभूत असलेल्यांप्रतीही सदैव कृतज्ञ राहू! आई, वडील, शिक्षक, निसर्गातील अनेक गुरू, राष्ट्र आणि विश्व यांची कृतज्ञता आपण व्यक्त करू तेव्हाच खऱ्या अर्थाने ते आपलं यशस्वी जीवनशिल्प असेल! अशाप्रकारे सात घटकांच्या सहाय्याने आपलं यशस्वी जीवनशिल्प घडवायचं की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवावं; कारण जीवनविद्या सांगते, ‘तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक