शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात? करून घ्या फाल्गुन मासाचा परिचय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 08:10 IST

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. 

हिंदू पंचांगानुसार चैत्र-वैशाखादी मासगणनेतील फाल्गुन हा शेवटचा बारावा महिना! या महिन्यात होळी, धुलिवंदन हे सण वगळता अन्य कोणतेही सण, व्रते येत नाहीत, तसेच कोणतेही शुभकार्य करत नाहीत, म्हणून अडगळीसारखा वाटणाऱ्या या मासाला 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे उपरोधिकपणे म्हटले जाते. कारण, या मासामुळे शुभकार्य खोळंबतात. १४ मार्चपासून फाल्गुन मास सुरू होत आहे. 

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. 

हा शिशिर ऋतूचा दुसरा महिना असून या महिन्यात उत्तरायण असते. या महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी मन्वादि आहेत. मन्वादि तिथी म्हणजे ज्या तिथीला सृष्टीचा पुन: आरंभ झाला असे मानले जाते, त्याला मन्वंतर किंवा मन्वादि तिथी असे म्हणतात. या तिथीला शिव आणि शक्तीची विशेष उपासना केली जाते. 

दक्षिण भारतात फाल्गुन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवळांमध्ये लहान-मोठे सर्व उत्सव फाल्गुन महिन्यात केले जातात. तसेच फाल्गुन महिन्यात येणारा होळी-रंगपंचमी-धुळवड हा सण सबंध देशात उत्साहाने साजरा केला जातो. वाईट विचार, आचार यांचे होलिकेत दहन करून नव्या रंगात, नव्या उत्साहात पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. 

गोकुळात असताना भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रंगपंचमी खेळल्यामुळे या उत्सवाला धार्मिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्यादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाच्या प्रेमरंगात रंगलेल्या गोपिका रंगपंचमीला श्रीकृष्णाशी रंगोत्सव खेळतात. तोच उत्साह सर्व वयोगटातील लोकांमध्ये आजही दिसून येतो. मनातील अढी सोडून सगळे जण एका रंगात रंगून जातात.

असा हा फाल्गुन पुरणपोळीचा गोडवा देणारा, विविध रंगांनी आयुष्य रंगवून टाकणारा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज करणारा महिना आहे. 

टॅग्स :Holiहोळी