मानसिक शांती मिळवण्याची साधने जाणून घ्या, शांतिगिरीजी महाराजांकडून; लोकमत भक्ती युट्युब लाईव्हच्या चर्चासत्रात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 11:05 AM2020-11-14T11:05:26+5:302020-11-14T11:05:56+5:30

१५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता Live ऐका स्वामी शांतिगिरीजी महाराजांना!

Learn the tools to get peace of mind, from Shantigiriji Maharaj; In the discussion session of Lokmat Bhakti YouTube Live! | मानसिक शांती मिळवण्याची साधने जाणून घ्या, शांतिगिरीजी महाराजांकडून; लोकमत भक्ती युट्युब लाईव्हच्या चर्चासत्रात!

मानसिक शांती मिळवण्याची साधने जाणून घ्या, शांतिगिरीजी महाराजांकडून; लोकमत भक्ती युट्युब लाईव्हच्या चर्चासत्रात!

Next

सद्यस्थितीत मनुष्याकडे सर्वकाही आहे, फक्त नाहीये, ती मनःशांती! त्याच्या शोधार्थ तो मठात, मंदिरात, अरण्यात फिर फिर फिरत आहे. मात्र, ती मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे सत्संग! संतांच्या सहवासात मनःशांती त्वरित मिळते. याचा अनुभव आपणही घेऊ शकता, १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता, आयोजित केलेल्या  स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या live चर्चासत्रात! या चर्चासत्रात ते 'मानसिक शांती मिळवण्याची साधने' आपल्या श्रोत्यांना सांगणार आहेत. 

ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालायची, तर ते मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी व्यक्ती हवी. हे कार्य करत आहेत जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले.

शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून दाखवून दिले. आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था असेल. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम शांतिगिरीजी बाबा आश्रमच्यावतीने करत असतात. 

असे सत्कार्य आपल्याही हातून घडावे, असे वाटत असेल, तर सर्वप्रथम मनाची बैठक स्थिर असणे महत्त्वाचे आहे आणि ती कशी करायची, हे शांतिगिरीजी बाबा आपल्याला लोकमत भक्ती युट्युब लाईव्ह या माध्यमातून १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता. 

https://www.youtube.com/c/LokmatBhakti/featured

Web Title: Learn the tools to get peace of mind, from Shantigiriji Maharaj; In the discussion session of Lokmat Bhakti YouTube Live!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.