शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
4
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
5
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
6
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
7
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
8
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
9
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
10
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
11
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
12
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
14
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
15
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
16
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
17
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
18
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
19
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
20
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

देवाने काय दिले नाही, याऐवजी काय दिले आहे, याचा विचार करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:02 IST

कठीण काळात मदत करता आली नाही, तर विनाकारण चिथवु नका!

एक अपंग भिकारी रस्त्याच्या कडेला भीक मागत बसलेला असतात. तिथेच काही अंतरावर एक तरुण मुलगा आपल्या मित्राची वाट बघत उभा असतो. मित्र येईपर्यंत तो भिकाऱ्याचे निरीक्षण करत असतो. आपला वेळ घालवण्यासाठी तो भिकाऱ्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, `तुला मी काही विचारले तर चालेल का?'`चालेल विचारा!'

`तुला दोन्ही हात नाहीत, लोक तुला भीक टाकून निघून जातात, पण या पैशांच्या मोबदल्यात तुला अन्न कोण देते?'`याच परिसरात आणखी एक भिकारी आहे. तो अन्न मागून आणतो, त्या मोबदल्यात त्याला मी जमलेले पैसे देतो. तो मला अन्न देऊन निघून जातो.' `अच्छा! पण तुला तर हात नाहीत, मग समोर ठेवलेले अन्न तू कसे खातोस?'`मी रस्त्याने येणाजाणाऱ्यांना म्हणतो, तुमचे दोन्ही हात सलामत राहोत, पण मला कोणीतरी दोन घास भरवा. हे ऐकून अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काही जण भरवायला येतात. अगदी सलग दहा दिवस येतात. त्यामुळे रोजची सोय होते.'`हे झाले भूकेचे, पण तहानही लागत असेल ना? मग?'`माझ्याकडे पाण्याचा माठ आहे. तो माठ मी थोडा तिरपा करुन परसरट भांड्यात पाणी ओततो आणि जनावरांसारखे जीभ लावून पाणी पितो.'`तुला घर दार नाही, मग इथल्या घाणेरड्या परिसरात तुला झोपेत डास चावत असतील नाही? हात नसताना तू कसे निभावतोस?'`त्याही बाबतीत मी प्राण्यांसारखा जमिनीवर लोळून कंड शमवतो. जसे जमेल तसे आयुष्य जगतो.'`पण या जगण्याला का जगणे म्हणायचे? तुझे जीवन, तुझा देह व्यर्थ आहे, असे नाही का वाटत?'

इतकावेळ शांत बसलेला भिकारी चिडतो आणि म्हणतो `मला देवाने जे दिले आहे, त्यात मी समाधानी आहे. याउलट धडधाकट शरीर असणारे तुमच्यासारखे लोक दुसऱ्याची मदत तर करत नाहीच, शिवाय त्यांची खिल्ली उडवायलाही धजावत नाहीत. तुमच्यासारख्या लोकांना संपूर्ण देह मिळून काय उपयोग झाला? त्यापेक्षा अपंग असूनही मी बरा. मी कधीच देवाकडे तक्रार करत नाही. संकटात संधी शोधत असतो आणि शांत निरोगी आयुष्य जगत असतो.