शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माणसांची पारख कशी करावी ते या चार बाहुल्यांकडून शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 08:00 IST

माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.

एका उद्योगपतीने आपल्या मुलाला एकदा चार बाहुल्या दिल्या. ते पाहून मुलगा म्हणाला, 'बाबा, बाहुल्या तर मुलींना भेट दिल्या जातात, तुम्ही मला बाहुल्या का दिल्या आहेत?'बाबा म्हणाले, `बेटा, कारण या साध्यासुध्या बाहुल्या नाहीत, तर यशस्वी आयुष्याचा मंत्र शिकवणाऱ्या या बाहुल्या आहेत. यांच्या कानाला छिद्र आहे. त्यातून हा दोरा आरपार घालून बघ. मग तुला मी यांचा मंत्र सांगतो.'

मुलाने कुतुहलाने एक एक करून बाहुलीच्या कानातून दोरा आरपार करायला सुरूवात केली. पहिल्या बाहुलीच्या एका कानातून दोरा घातला असता तो दुसऱ्या कानातून बाहेर आला. दुसऱ्या बाहुलीच्या एका कानात घातलेला दोरा तोंडातून बाहेर आला. तिसऱ्या बाहुलीच्या एका कानातून घातलेला दोरा तिच्या पोटात गेला. 

ते पाहून बाबांनी मुलाला थांबवत म्हटले, `बेटा या केवळ बाहुल्या नाहीत, तर ही माणसांची वृत्ती आहे. ती ओळखायला मी तुला शिकवतोय. पहिल्या वृत्तीची माणसं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. दुसऱ्या वृत्तीची एका कानाने ऐकतात आणि तोंडाने दुसरीकडे सांगून मोकळे होतात. तिसऱ्या वृत्तीची माणसं कानाने ऐकून पोटात दडवून ठेवतात.'मुलगा भुवया उंचावत म्हणाला, `मग बाबा, या तिघींपैकी कोणाची वृत्ती चांगली? कोणावर विश्वास ठेवावा?' 

तेव्हा बाबांनी त्याला चौथी बाहुली दिली आणि तीनदा दोरा तिच्या कानातून आरपार घालायला सांगितला. त्यावेळेस दोरा एकदा कानातून, दुसऱ्यांदा ओठातून, तिसऱ्यांदा पोटातून बाहेर निघाला. ते पाहून बाबा म्हणाले, चौथ्या बाहुलीसारख्या वृत्तीचे लोक विश्वसनीय असतात. जे आवश्यक तिथे बोलतात, आवश्यक ते पोटात ठेवतात आणि आवश्यक तिथेच बोलतात. असे लोक जोडायला शिक आणि तू सुद्धा असाच बनलास, तरच विश्वसनीय ठरशील आणि भविष्यात मोठा उद्योगपती बनशील.

उद्योजकाने दिलेली शिकवण आपणही लक्षात घेण्यासारखी आहे. तेव्हा माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी