शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यसंचयाच्या दृष्टीने कार्तिक मासातले शेवटचे काही दिवस बाकी; कशी करावी उपासना ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:45 IST

श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात. 

कार्तिक महिन्याला अधिक मसाइतकेच महत्त्व असते. कारण त्याला दामोदर मास असेही म्हणतात. कार्तिक महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण, या महिन्यात अनेक धार्मिक विधी, सण, उत्सव पार पाडले जातात. उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, तसेच ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो, असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात. 

घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. त्रिपुरी पौर्णिमेला तुलसी विवाह मुहूर्त समाप्ती होणार आहे. 

तुलसी विवाहाइतकेच कार्तिक मासात महत्त्व असते, कार्तिक स्नानाला! पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्याने किंवा प्रयाग मध्ये कुंभ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळते, तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्यानं मिळते. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते.  पद्म पुराणानुसार जी व्यक्ती संपूर्ण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात स्नान करते आणि भगवान विष्णू यांची पूजा करते, भगवान श्री विष्णूची कृपा त्याला मिळते. पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले आहेत. 

कार्तिक महिन्यात स्नान आणि दानाचे महत्त्व -हा महिना धार्मिक कार्यांसाठी उत्तम मानला गेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपत केलेला दानधर्म श्रीकृष्णाच्या चरणी पोहोचतो. म्हणून या मासात गरजूंना शक्य तेवढी मदत जरूर करावी.