शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरी पौर्णिमा: ५ शुभ राजयोग, ‘असे’ करा लक्ष्मीपूजन; पाहा, मुहूर्त, महत्त्व, मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:21 IST

Kojagiri Purnima 2023: यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून येत आहेत.

Kojagiri Purnima 2023: नवरात्रोत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जाईल. संपूर्ण देशभरात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, अशी मान्यता आहे. त्यामुळे ही पौर्णिमा सर्वांत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी चंद्रही आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो आणि अमृताचा वर्षाव करतो, असे म्हटले जाते. या दिवशी चंद्र देवाची पूजा करणे सर्वात शुभ मानतात. कोजागिरी पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी चंद्रग्रहणही लागणार आहे. 

ऑक्टोबर महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. २८ ऑक्टोबर रोजी रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. कोजागिरी पौर्णिमा असल्याने वेधकाळात रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध-सारखेचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र, प्रसाद म्हणून एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी घेता येऊ शकेल, असे सांगितले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोजागिरी पौर्णिमेला जुळून येत असलेले ५ शुभ राजयोग

 शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग, सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग, शनीचा शश योग, सौभाग्य योग आणि सिद्धी योग असे पाच शुभ योग जुळून येत आहेत. राजयोगाप्रमाणे याचा प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे.

कोजागिरी पौर्णिमेचा व्रत पूजा विधी 

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. व्रताचा संकल्प करावा. चौरंगावर भगवान सत्यनारायण, लक्ष्मी देवीचे आवाहन करून शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पूजन करावे. लक्ष्मी देवीची आवडती फुले,  फळे अर्पण करावीत. खीर किंवा लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर विष्णु सहस्त्रनाम पठण करा. तसेच या दिवशी चंद्राशी संबंधित मंत्र आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मंत्रांचा जप करावा.

 

टॅग्स :kojagariकोजागिरी