शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kojagiri Purnima 2021 : कोजागरीच्या रात्री जो जागतो, त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो; वाचा कोजागिरीचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:04 IST

Kojagiri Purnima 2021 : जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

अश्विन शुद्ध पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. उद्या म्हणजेच मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते. त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, 'कोण जागे आहे?' जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

कोजागरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक किंवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. 

लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमातद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणीजगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनीतस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी.

टॅग्स :Navratriनवरात्रीkojagariकोजागिरी